पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १४ इझाकाचे लग्न. मागे या देशास यायास मान्य होणार नाही, तर जेथून तूं आलास, त्या देशास म्या तुझ्या पुत्राला परत घेऊन जावे काय?" अब्राहामाने त्याला मटले: “खा माझ्या पुत्राला तिकडे परत नेऊं नये ह्मणून तूं आपणाला सभाळ. आकाशाचा देव परमेश्वर, ज्याने माझ्या जन्माच्या देशाहून मला आणले आणि मजपासीं शपथ केली की, 'मी हा देश तुझ्या संतानाला देईन,' तो आपल्या दूताला तुझ्यापुढे पाठवील आणि तूं तेथून माझ्या पुत्रा- साठी नवरी आणसाल ; आणि बायको तुझ्या मागे येण्यास मान्य न झाली तर या माझ्या शपथेपासून तूं मोकळा होसील.” तेव्हां चाकराने त्या गोष्टीविषयी त्यासी शपथ केली. मग तो दहा उंट व अनेक द्रव्य घेऊन निघाला आणि पदनअरामांतील नाहोराच्या नगरास गला. ३. आणि एका संध्याकाळी तो नगराजवळ पोहंचला. शहराच्या बाहेर विहीर होती तींतून पाणी काढायास बायका येत असत त्यावेळेस त्याने विहिरीजवळ आपल्या उंटांस बसविले. आणि तो बोललाः "हे परमेश्वरा, माझा धनी अब्राहाम याच्या देवा, मी विनंती करतो की, तूं आज मला सफळ होऊ दे, आणि माझा धनी अब्राहाम याजवर कृपा कर, पाहा, न- गरांतील माणसांच्या कन्या पाणी काढायासाठी बाहेर येतात, तर ज्या मुलीला मी ह्मणेन की, म्या प्यावे ह्मणून कृपेंकरून तूं आपली घागर उतर; आणि ती ह्मणेल पी, आणि तुझ्या उंटांसही मी पाजीन, त्वा आपला चाकर इशाक यासाठी जी नेमली आहे ती तीच होवो.” आणि त्याने बोलणे संपविल्यापूर्वी पाहा, नाहोर याचा पुत्र बथुवेल याची कन्या रिबका ती निघाली आणि तिच्या खांद्यावर तिची घागर होती. मुलगी तर दिस- ण्यांत फार सुंदर कुमारी होती. मग ती विहिरीत उतरून आपली घागर भरून वर आली, तेव्हां चाकर तिला भेटायास धावून ह्मणाला: "कृपेने तं आपल्या घागरीतून थोडे पाणी मला पिऊ दे." ती ह्मणाली: 'प्या महाराज," आणि त्याला पुरे पाजल्यावर तिने मटले: “तुझ्या उंटांसाठीही ते पुरे पितील तोवर मी पाणी काढीन." मग तिने त्वरा करून आपली घागर कुंडीत रिचविली व फिरून काढायास विहिरीकडे गेली; तसे तिने त्याच्या सगळ्या उंटांसाठी काढले. तेव्हां तो माणूस तिजविषयी दंग झाला. आणि परमेश्वराने त्याचा मार्ग सफळ केला किंवा नाही, हे जाणाय तो उगाच राहिला. आणि उंट प्याले, तेव्हां माणसाने सोन्याची नथ व 51