पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२ सारेचे मरण. प्रक० १४ णीस नेले होते आणि जसी कावरणान्यापटें मेंढी मुकी असती तसे त्याने आपले तोड उपडिलें नाहीं (यशा० ५३, ७). _मोरीयांतील जो डोंगर तो हा होता की, ज्यावर पुढे देऊळ बांधले गेले.- अब्रा- हामाने आपल्या पुत्राच्या ठिकाणी होमरूप अर्पण करावे, ह्मणून देवाने त्याला मेंढा दाखविला. तेणेकड़न सर्व जगाच्या पापासाठी योग्य व सर्वकाळपर्यंत टिकणारे जे खीस्ता, अर्पण ते होईपर्यंत प्रतिरूपी पशयज्ञ मान्य अहि असे त्याने दाखविलें. प्रक० १४. सारेचं मरण. इझाकाचे लग्न. अब्राहा- माचा मृत्यु. (उत्प० २३ व २४). १. सारा १२७ वर्षांची असतां मरण पावली. तेव्हां अब्राहामाने तिजसाठी शोक केला. आणि त्याने हेब्रोनाजवळ ज्या भूमीत माखपेला नामक गुहा होती, ती भूमि व गुहा एफ्रोन जो हित्ती यापासून त्याच्या लोकांच्या देखत चारशे शेकेल रुपयांस प्रेतस्थानाचे वतन होण्यासाठी विकत घेतली आणि त्या गुहेमध्ये अब्राहामाने सारेला पुरले *).

  • ) अब्राहामाने प्रेतस्थानाच्या वतनासाठी जमीन विकत घेतली, यावरून "अवघा देश

तुझ्या संतानाचा होईल" या ईश्वरी बननावर त्याचा पूर्ण विश्वास होता असें दिसन येते. स्याच्या संततीला चारशे वर्षेपर्यंत देशांतर करायाचे होते, त्या अवघ्या कातन ज्या देशांतील माषेला गुहेत आमचा पूर्वज पुरला गेला आहे, तो देश आमचा बचनदन देश आहे, याविषयी आपल्या संतानास अठवण असाची, झणून त्या गुहेत आपल्या व आ- पल्या बायकोच्या अस्थि शांतीने राहव्या असी त्याची इच्छा होती. २. सुमारे त्यावेळेस अब्राहामाला वर्त्तमान आले की: "हारानांत राहणारा तुझा भाऊ नाहोर हाही संततिवान झाला आहे." अब्राहाम तर मातारा झाला, आणि परमेश्वराने अवघ्यांविषयी त्याला आशीर्वाद दिला. तेव्हां अब्राहामाने आपल्या घरचा वडील चाकर (अलियेजेर) जो आपल्या अवघ्यांवर अधिकार करीत होता त्याला सांगितले की: "आका- शाचा देव व पृथ्वीचा देव परमेश्वर याची शपथ मी तुला घालतों की, ज्यांमध्ये मी प्रवासी राहतो त्या खनान्यांच्या कन्यांतून माझ्या पुत्रासाठी नवरी करूं नको. तर माझ्या देशास व माझ्या गोत्रांस जाऊन माझा पुत्र इझाक यासाठी नवरी कर.” चाकर ह्मणाला: "कदाचित् बायको माझ्या