पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० . इश्माएलास बाहेर घालविणे. [प्रक०१३ तुझे संतान आहे." नतर अब्राहामाने लेकरूं देऊन तिला रवाना केले*). तेव्हां ती निघून बैरशेबा रानांत फिरत गेली. आणि मसकेंतील पाणी सरले, तेव्हा तिने लेकरूं एका झुडपाखाली टाकले, आणि ती बाणाच्या टप्या इतकी दूर जाऊन समोर बसली आणि "म्या लेकराचे मरण पाहूं नये,” असे बोलून ती पुढे बसून हाक फोडून रडली. आणि देवाने मुल- ग्याचा शब्द ऐकला आणि तिचे डोळे उघडिले व तिने पाण्याचा कूप पाहिला, मग तिने जाऊन मुलग्याला पाजिले. तर देव मुलासंगतीं होता, आणि तो वाढला व रानांत राहून धनुर्धर झाला.- इश्माएल बारा सरदारांचा पूर्वज झाला आणि त्याची संतती, ह्मणजे अरब लोक. हे अशूरापासून मिसर देशापर्यंत राहत होते. _*) ज्यावेळेस अब्राहामाने इश्माएलाला घालविले त्यावेळेस तो मुलगा पंधरा वर्षांचा होता. २. या गोष्टी नंतर देवाने अब्राहामाची परीक्षा घेतली आणि त्याला मटले: “तूं आपला पुत्र, आपला एकुलता इझाक, ज्यावर तूं प्रीति करितोस त्याला घेऊन मोरीया देशांत जा, आणि तेथील डोगरांमधील एक जो मी तुला सांगेन, त्यावर त्याचे होमरूप अर्पण कर." मग सकाळी अब्राहाम तयार झाला. त्याने आपले गाढव आवळले आणि आपल्या तरुणांतले दोन व आपला पुत्र इझाक आपणाबरोबर घेतले आणि होमाची लांकडे फोडली. मग उठून जी जागा देवाने त्याला सांगितली होती तिकडे चालता झाला. मग तिसऱ्या दिवसी अब्राहामाने ती जागा दुरून पाहिली. तेव्हां अब्राहाम आपल्या तरण्यांस ह्मणाला: “एथे गाढवाजवळ बसा. आणि मी व मुलगा तिकडे जाऊन भजन करूं आणि माघारे तुह्माकडे येऊ.” मग अब्राहामाने होमाची लांकडे घेऊन आपला पुत्र इझाक यावर ठेवली, आणि आपल्या हाती विस्तव व सुरी घेतली; तसे ते दोघे बराबर चालले. नंतर त्या जाग्यावर पोहंचून अब्राहामाने तेथे वेदी बांधली व लांकडे रचलीं, आणि आपला पुत्र इझाक याला बांधले, आणि वेदीवरच्या लाकडांवर त्याला ठेवले. मग अब्राहामाने आपला हात लांबवून आपला पुत्र वधायासाठी सुरी घेतली. तेव्हां परमेश्वराचा दूत आकाशांतून त्याला हाक मारून बोललाः "अब्राहामा, तूं मुलावर आपला हात टाकू नको व त्याला काहीच करूं नको, कां तर आतां म्या