पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८ सदोम व गमोरा.. प्रक० १२ त्याकडे वळून त्याच्या घरी आले. नंतर ते निजल्यापूर्वी नगरांतील माणसे अबालवृद्ध चहुंकडून अवघे लोक येऊन यांनी घर घेरिले आणि लोटाला हाक मारून पटले“जी माणसे या रात्री तुजकडे आली ती कोठे? त्यांस आह्माजवळ बाहेर आण." मग लोट त्यांकडे दाराबाहेर गेला आणि आपण कवाड लावून ह्मणाला: "भावानो तुह्मी दुष्टाई करू नका." मग ते बोलले: “दूर हो! हा एकटा प्रवास करायास आला आणि न्याया- धीश झाला !” तेव्हां ते लोटावर फार खेटले आणि कवाड फोडायास आले. तेव्हां त्या माणसांनी आपला हात बाहेर करून लोटाला आपणाकडे घरांत ओढून कवाड बंद केले, आणि दाराजवळ जी माणसे होती त्यांस आंधळें करून टाकले, मग ती दार शोधितां थकली, आणि ते मनुष्य लोटाला ह्मणाले: “तुझे अणखीं एथे जे कोणी आहेत त्यांस या ठिकाणांतून घेऊन जा, कारण की या ठिकाणाचा नाश करायास परमेश्वराने आह्मास पाठ- विले आहे.” मग लोट बाहेर जाऊन ज्यांनी त्याच्या कन्या विवाहिल्या त्या आपल्या जावयांस ह्मणालाः "उठा, या ठिकाणांतून निघा, कांतर परमे- श्वर नगराचा नाश करितो." परंतु तो त्यांस विनोद करणारा असा भासला. २. आणि सकाळ उजाडली तेव्हां दूतांनी लोटाला घाई करून सांगितले: “उठ, आपली बायको व आपल्या दोघी कन्या यांस घेऊन जा, नाही तर तुझा नाश होईल," लोट खोळंबा करीत असतां त्या दूतांनी त्याचा हात व त्याच्या बायकोचा हात व त्याच्या दोघी कन्यांचा हात धरिला आणि त्यांस काढून नगराबाहेर ठेवले, आणि नगराबाहेर त्याला सांगितलें: "तूं आपला जीव घेऊन पळ, आपल्या पाठीमागे पाहूं नको, आणि कोठे मैदानांत उभा राहूं नको, तुझा नाश होऊ नये ह्मणून डोंगराकडे पळ." मग लोट ह्मणाला: "नको, माझ्या प्रभू, पाहा माझ्याने डोगराकडे पळवत नाहीं; कदाचित् मला कांही वाईट लागेल व मी मरेन. पाहा है नगर. इकडे पळायास जवळ आहे व ते लहान ; मला इकडे पळू द्या; ते लहान नाहीं काय? मग माझा जीव वाचेल." तेव्हां तो त्याला ह्मणालाः “पाहा. या गोष्टीविषयीही म्या तुला मानले आहे, ह्मणजे ज्याविषयीं तूं बोललास स्या नगराचा नाश मी करणार नाहीं; खरा करून तिकडे पळ, कांकीतूं तेथे जाईस तोपर्यंत माझ्याने कांहीं करवत नाहीं." यावरून त्या नगराचें नांव जवार (लहान ) पडले. पृथ्वीवर सूर्य उगवला तेव्हां लोट जवारांत