पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १२] सदोम व गमोरा. नीतिवंतांचाही नाश करसील काय? कदाचित् त्या नगरांत ५० नीतिवंत असतील आणि त्यांकरितां जाग्याचे सहन न करसील काय?" परमेश्वर ह्मणालाः “सदोम नगरामध्ये ५० नीतिवंत मला मिळाले, तर त्यांकरितां सर्व जाग्याचे सहन करीन.' तेव्हां अब्राहामाने उत्तर दिले: “पाहा, मी धूळ व राख असतां प्रभूजवळ बोलू लागलो, कदाचित् ५० नीति- वंतांमध्ये पांच उणे असतील, तर पांचांकरितां सर्व नगराचा नाश कर- सील काय?" त्याने मटले. "तेथे ४५ मला मिळाले, तर मी नाश करणार नाही." मग याने त्याजवळ आणखी बोलून झटले: "कदाचित् तेथे ४० मिळतील;" त्याने मटले: "चाळिसांकरितां करणार नाही." मग अब्राहाम ह्मणाला: "प्रभूला राग न यावा मणजे मी बोलेन, कदाचित् तेथे ३० मिळतील;" त्याने ह्मटलेः “तेथे ३० मला मिळाले, तर करणार नाही. मग हा ह्मणालाः “पाहा, मी प्रभूसी बोलूं लागलों; कदाचित् तेथे २० मिळतील." तेव्हां त्याने मटले: “विसां- करितां मी नाश करणार नाही." मग अब्राहाम ह्मणालाः “प्रभूला राग न यावा मणजे मी या एकच वेळेस बोलेन, कदाचित् तेथे दाहा मिळतील;" त्याने झटले: “दाहाकरितां मी नाश करणार नाही." तेव्हां परमेश्वर अब्राहामासी बोलणे झाल्यावरच गेला, आणि अब्राहामही आपल्या ठिकाणी परत आला * ). _*) देवाने अब्राहामासी करार केला त्या अर्थी तो देवाचा मित्र (याक० २,२३), पवित्र देशाचा धनी आणि सर्व राष्ट्रांसाठी तारण मिळविणारा झाला. या कारणास्तव देव पापण काय करणार, हे जसे कोणी आपल्या मित्राला तसे त्याला प्रगट करितो. आणि याच कारणाने अब्राहामाने धैर्य धरून जी नगरें नाशास पात्र झाली होती, त्यांसाठी फार नम्रतेने मध्यस्थी केलो. प्रक० १2. सदाम व गमोरा. (उत्प० १९). १. संध्याकाळी तर दोघे दूत सदोमास आले, तेव्हां लोट वेसींत बसला होता, आणि तो पाहून त्यांस भेटावयास उठला आणि तोंड भूमी- कडे लावून नमला आणि ह्मणालाः “पाहा प्रभूनो, तुह्मी आपल्या दासाच्या घराकडे वळून उतरा." आणि त्याने त्यांस फार आग्रह केला, मग ते