पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अब्राहाम देवाचा मित्र. [प्रक० ११ भेटायास धावून भूमीकडे लवला आणि ह्मणाला: "माझ्या प्रभू, तुझ्या दृष्टीत मी कृपा पावलो, तर आपल्या दासाजवळून जाऊ नको. थोडे पाणी आणू द्या, आणि तुह्मी आपले पाय धुऊन झाडाखाली विसांवा घ्या; मी भाकरीचा तुकडा आणीन आणि तुह्मी आपल्या जिवास आधार करा, मग पुढे जा." ते ह्मणाले: “तूं बोललास तसे कर." मग अब्राहाम डेयांत सारेकडे धावून ह्मणाला: "तीन मापांचे बारीक पीठ लवकर तयार कर व मळून पोळ्या कर." आणि अब्राहामाने गुरांकडे धावून कोवळे व चांगले वासरूं घेऊन पोन्याच्या हाती दिले, मग याने त्याचा पाक करायास त्वरा केली, नंतर अब्राहामाने लोणी व टूध व ज्याचा पाक केला ते वासरूं आणून त्यांपुढे ठेवले. आणि तो त्यांजवळ झाडा- खाली उभा राहातां ते जेवले. मग ते त्याला ह्मणाले: “तुझी बायको सारा कोठे आहे.” तो ह्मणाला : “पाहा डे-यांत.” मग दूत ह्मणालाः "जननाच्या वेळेप्रमाणे मी तुजकडे परत येईनच आणि पाहा, तुझी बायको सारा इला पुत्र होईल." तेव्हां डे-याचे दार त्याच्या मागे होते तेथे सारेने हे ऐकलें, आणि ती आपणासी हासली. तेव्हां परमेश्वर अब्राहा- माला ह्मणाला: "सारा का हासली? कोणतीही गोष्ट परमेश्वराला असाध्य आहे काय?" तेव्हां सारा नाकारीत ह्मणाली: “मी हासले नाही." मग तो बोललाः “असें नाहीं खचीत हासलीस" *). ___*) हे परमेश्वराचे भेटीस येणें विशेष करून सारेसाठी झाले, कारण की ती वचनदत्त जें संतान त्याची आई होईल, त्याच्या अगोदर तिलाही वचनावर विश्वास ठेवायास शिकविणे अवश्य होतं. २. नंतर त्या माणसांनी तेथून उठून सदोमाकडे तोंड केले, आणि अब्राहाम यांस बोळवायास त्यांसंगती गेला. तेव्हां परमेश्वराने मटले : "मी जे करणार ते अब्राहामापासून लपवू काय? कारण त्याकडून पृथ्वीं- तील सर्व राष्ट्रे आशीर्वाद पावतील. कां तर मी त्याला जाणतो की, तो आपल्यामागे आपली लेकरे व आपला परिवार यांस आज्ञा देईल की, ते नीति व न्याय आचरितांना परमेश्वराचा मार्ग पाळतील." मग परमेश्वर ह्मणालाः “सदोम व गमोरा यांची आरोळी मोठी व त्यांचे पाप अतिभारी." मग ती दोन माणसे तेथून फिरली व सदोमाकडे चालली, पण अब्राहाम परमेश्वरासमोर अद्याप उभा राहिला आणि झगालाः “पाप्यांसंगती