पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/४०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८० सर्वकालिक जीवन आणि सर्वकालिक मरण. [प्रक० २०० अझून दिसत नाही. पण आह्मी जाणतों की तो प्रगट होईल, तेव्हां आह्मी यासारखे होऊं, कारण जसा तो आहे तसाच आह्मास दिसेल" (१ योहा० ३,२). "जर आह्मी लेकरे आहो तर वारीस, देवाचे वारीस आणि खीस्ताचे सोबती वारीस आहो” (रोम०८.१७). "खीस्ताने आह्मास अयंत मोठी व मोलवान् वचने दिली आहेत की, आमी ईश्वरी स्वभावाचे विभागी व्हावे" (२ पेतर १,४). याप्रमाणे खीस्ताने आपल्या मध्य- स्थीच्या प्रार्थनेत (प्रक० १५३ क० ३) आमासाठी विनंती केली आहे की, "ते सर्व एक असावे, जसें तूं, बापा, मजमध्ये आणि मी तुजमध्ये, तसे तेही आमामध्ये एक असावे, आणि खा जो महिमा मला दिला तो म्या त्यांस दिला आहे, यासाठी की जसे आह्मी एक आहो तसे तेही एक असावे. मी यांमध्ये आणि तूं मजमध्ये असे असावे. हे बापा, मी असे इच्छितों की, जेथे मी आहे तेथें खा जे मला दिले त्यांनीही मजपासी असावे, यासाठी की, जो माझा महिमा खा मला दिला तो त्यांनी पाहावा" (योह ० १७,२१-२४). देवाच्या लोकांच्या ह्या पूर्णतेची अवस्था योहान्नाने दृष्टां- ताने पाहून तिचे वर्णन जे केले ते असे: "म्या नवे आकाश व नवी पृथ्वी पाहिली. आणि म्या पवित्र नगर जे नवे यरूशलेम ते देवापासून आका- शांतून उतरतां पाहिले, जसी नवरी आपल्या नवऱ्यासाठी शृंगारलेली तसे ते सिद्ध केलेले होते. आणि म्या आकाशांतून अशी मोठी वाणी ऐकिली की, पाहा, देवाचा मंडप माणसांपासी आहे, आणि तो त्यांपासीं वस्ती करील आणि ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतां त्यांच्यासंगतीं (इमानूवेल. प्रक० ८१ क० १.) त्यांचा देव असा होईल. आणि देव त्यांच्या डोळ्यां- पासून प्रत्येक अश्रु पुसून टाकील आणि मरण आणखी होणार नाही, शोक, आक्रंदन आणि पीडा आणखी होणारच नाहींत. आणि म्या त्यांत देऊळ पाहिले नाही, कांकी प्रभू जो देव, जो सर्वसत्ताधारी, तो व कोकरा हेच त्यांतील देऊळ आहेत. आणि नगरांत सूर्याचा किंवाचंद्राचा प्रकाश पडण्याची गरज नव्हती, कांकी देवाच्या तेजाने ते प्रकाशित केले, आणि कोंकरा त्याचा दिवा आहे" (प्रग० २१ ). असे असतां देव "सर्वां- मध्ये सर्व" होईल (१ करिं० १५,२८). २. सर्वकालिक मरण हे तर देवापासून व त्याच्या सुखावस्थेपासून निरंतर वियोग पावून दूर असणे असे आहे.--अन्यायी ठरून शापग्रस्त जे आहत