पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/४०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० २००] सर्वकालिक जीवन आणि सर्वकालिक मरण. ३८१ त्यांची राहण्याची जागा न विझणारा अग्नि असा झटला आहे. "तेथे त्यांचा किडा मरत नाही व अग्नि विझत नाहीं" (मार्क ९, ४४.४५.) ती जागा "बाहेरचा अंधार" असीही झटलेली आहे. "तेथे रडणे व दांतखाणे होईल" ( मात्थी ८, १२). अणखी “काळोखाची निबिडता जी सर्वकाळ ठेविली आहे" असी त्याला संज्ञा दिली आहे (२ पेतर २, १७). तेथे "ते प्रभूच्या दृष्टीसमोरून आणि त्याच्या पराक्रमाच्या तेजा- समोरून सर्वकाळचा नाश असा दंड भोगतील" (२ थेस्स० १,९).- आणि योहान्नाने दृष्टांताने अग्नीचे सरोवर पाहिले, "तेथे ते रात्रंदिवस सदासर्वकाळ पीडा पावतील (प्रग० २०, १०), आणि त्यांचा पीडेचा धूर सदासर्वकाळ चढत आहे" (प्रग० १४, ११). GENE समाप्त. BOOTBAY: PRINTED AT TIE EDUCATION SOCIETY'S PRESS, BYCULLA.