पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/४०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० २००] सर्वकालिक जीवन आणि सर्वकालिक मरण, ३७९ आमी तुला भुकेले किंवा तान्हेले, किंवा परके किंवा उघडे किंवा रोगी किंवा बंदीशाळेत असे केव्हां पाहून तुझी सेवा केली नाही? तेव्हां तो त्यांस उत्तर देईल की, मी तुह्मास खचीत सांगतो, तुमी या लहानांतील एकाला असे केले नाही तितक्यावरून मला केले नाही. आणि ते सर्वकाळच्या शासनांत जातील, पण नीतिमान सर्वकाळच्या जीवनांत जातील" ( माथी २५, ३१-४६). योहान्नाने शेवटला न्याय दृष्टांताने पाहून त्याचे वर्णन याप्रमाणे केले. “म्या मोठे पांढरे आसन व त्यावर कोणी बसलेला पाहिला, त्याच्या तोंडापुढून पृथ्वी व आकाश पळाले. आणि म्या मेलेले लहान थोर, हे देवाच्या पुढे उभे राहिलेले पाहिले, आणि पुस्तकें उघडली, आणि त्या पुस्तकांत ज्या गोष्टी लिहिल्या होत्या त्यांवरून मेलेल्यांचा न्याय यांच्या कमांप्रमाणे झाला. आणि जीवनाचे पुस्तक ह्मणून जे होते, त्यांत जो कोणी लिहिलेला सांपडला नाहीं तो अग्नीच्या सरोवरांत टाकला गेला" (प्रग० २०, ११--१५ ). प्रक०2००. सर्वकालिक जीवन आणि सर्वकालिक मरण. १. सर्वकालिक जीवन है खीस्ताच्या व पवित्र आत्म्याच्या संबंधाने देवासी सर्वकाळपर्यंत परिपूर्णपणे संगत धरून सुख पावणे असे आहे. "देवाने आपल्या प्रीति करणान्यांसाठी ज्या गोष्टी तयार केल्या त्या डोळ्या- ने पाहिल्या नाहीत, कानाने ऐकिल्या नाहीत आणि माणसाच्या अंत:- करणांत आल्या नाहीत" ( १ कार० २,९.). इहलोकों आमी विश्वासाने, परलोकी दृष्टीने चालतो (२ करि० ५,७). "प्रीति कधीही खुंटत नाहीं; भविष्य सांगणे असले तरी ते नाहीसे होईल, अन्य भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील, विद्या तरी ती नाहींसी होईल. कारण आमो कांहीं अंशी जाणतो आणि काही अंशी भविष्य सांगतो, पण में पूर्ण ते येईल तेव्हा जे काही अंशी ते व्यर्थ होईल. आतां आमास अरशीकडून अंधक दिसते, पण तेव्हां तोडोतोंडी पाहूं. आतां मी काही अंशी जाणतो, पण तेव्हां ज- सा माझी पूर्ण ओळख होती तसे मी ओळखीन" (१ कार० १३, ८- १२ ). "आतां आमी देवाची लेकरें आहों, आणि आमी काय होऊं हैं