पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/४००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३७८ शेवटला न्याय. प्रक० १९९ प्रक० १९९. शेवटला न्याय, "सर्व न्याय ठरविणे बापाने पुत्राला सोपून दिले आहे, यासाठी की जसा बापाचा मान करतात, तसा पुत्राचाही मान सर्वांनी करावा" (योह. ५, २२. २३). “आह्मी सर्व खीस्ताच्या न्यायासनासमोर उभे राहिले पाहिजे, यासाठी की शरीराकडून जे जे केले, ते बरे असो वाईट असो, याप्रमाणे प्रयेकाने फळ पावावे" (२ करि० ५, १०). शेवटल्या न्यायाचे वर्णन नीस्ताने स्वतां दाखल्याने केले आहे ते येणेप्रमाणे. "मनु- ब्याचा पुत्र आपल्या तेजाने येईल आणि त्याबरोबर सर्व पवित्र दूत येतील, तेव्हां तो आपल्या तेजाच्या आसनावर बसेल, आणि त्यासमोर सर्व राष्ट्र जमा होतील, आणि जसे मेंढपाळ शेरडांतून मेढरे वेगळी करितो तसे तो त्यांस वेगवेगळे करील. आणि मेंढरांस तो आपल्या उजवीकडे व शेरडांस डावीकडे उभे करील. तेव्हां राजा आपल्या उजवीकडल्यांस ह्मणेल : अहो माझ्या बापाचे आशीर्वादितहो, या, जे राज्य जगाच्या मांडण्या- पासून तुह्माकरितां तयार केले ते वतन घ्या. कारण मी भुकेला होतो तेव्हां तुह्मी मला खायास दिले, तान्हेला होतो तेव्हां मला प्यायास दिले, परका होतो तेव्हा मला घरांत घेतलें, उघडा होतो तेव्हा मला पांघरूण दिले, रोगी होतो तेव्हां माझा समाचार घेतला,बंदीशाळेत होतो तेव्हां मजकडे आला. या वे- ळेस नीतिमान त्याला उत्तर देतील की हे प्रभू,आमी तुलाभुकेले केव्हां पाहून खायास दिले आणि तान्हेलें केव्हां पाहून प्यायास दिले? तुला परके केव्हां पाहून घरांत घेतले आणि उघडे पाहून पांघरूण दिले! तुला रोगी अथवा बंदीशाळेत केव्हां पाहून तुजकडे आलो !मग राजा त्यांस उत्तर देईल की, मी तुह्मास खचीत सांगतो, या माझ्या भावांतील लहानांतून एकाला तह्मी असे केले तितक्यावरून मलाच केले आहे. तेव्हां डावीकडल्या- सही तो ह्मणेल : अहो शापग्रस्तहो, जो सर्वकाळचा अग्नि सेतानासाठी व त्याच्या दूतांसाठी तयार केला आहे त्यांत मजपासून जा. कारण मी भुकेला होतो तेव्हां तुह्मी मला खायास दिले नाहीं; तान्हेला होतो तेव्हां मला प्यायास दिले नाहीं; परका होतो तेव्हां मला घरांत घेतले नाही; उघडा तेव्हा मला पांघरूण दिले नाहीं; रोगी व बंदीशाळेत होतो तेव्हा माझा समाचार घेतला नाही. तेव्हां हेही त्याला उत्तर देतील की: हे प्रभू,