पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३७५ प्रक० १९७] ख्रीस्ताचे पुन्हा आगमन. ल्यामुळे बहुतांची प्रीति थंड होत जाईल. राष्ट्र राष्ट्रावर व राज्य राज्या- वर उठेल, आणि जागोजागी दुकाळ व मय व भूमीकंप होतील. तेव्हां जगाच्या प्रारंभापासून आजपर्यंत झाले नाहीत असे मोठे क्लेश त्या काळी होतील. आणि ते दिवस थोडे केले नसते, तर कोणीच न निभावता, परंतु निवडलेल्यांसाठी ते दिवस थोडे केले जातील. आणि मग त्या दिवसांतील क्लेशानंतर लागलाच मनुष्याच्या पुत्राला पराक्रमाने व मोठ्या प्रतापाने आकाशाच्या मेघांवर येतांना पाहतील. (मात्थी २४ ). प्रक० १९७. नीस्ताचं पुन्हा आगमन, जसा रात्री चोर तसा प्रभूचा दिवस येतो. कां की शांति व अभय असे ते ह्मणतात, तेव्हां त्यांवर अकस्मात् नाश येईल, आणि ते सुटणारच नाहींत (१ थेस्स ० ५, २. ३). जसी वीज पूर्वेतून निघून पश्चिमे- पर्यंत चमकती तसे मनुष्याच्या पुत्राचे येणेही होईल ( मात्थी १४, २७ ), समुद्र व लाटा यांची गर्जना होत असतां भयाने व जगावर येणाऱ्या गोष्टीची वाट पाहण्याने माणसे प्राण सोडीत असतां पृथ्वीवर राष्ट्रांस संकट व पेंच होईल; कांतर आकाशांतील सैन्ये डळमळतील ( लूका २१, २५. २६.), परंतु आत्मा ( ख्रिस्ती लोकांतील आत्मा ) आणि नवरी ( संपूर्ण ख्रिस्ती मंडळी) ही ह्मणत की,ये हे प्रभू येशू , होय, ये !(प्रग० २२,१७.२०). त्या काळी सूर्य अंधकारमय होईल, चंद्र आपला उजेड देणार नाही आणि तारे आकाशांतून पडतील. तेव्हां मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशांत दिसेल, आणि त्या काळी पृथ्वीवरल्या सर्व जाती उर बडवून घेतील, आणि मन- प्याच्या पुत्राला पराक्रमाने व मोठ्या प्रतापाने आकाशाच्या मेघांवर येतांना पाहतील. आणि करण्याच्या मोठ्या नादाने तो आपल्या दूतांसपाठवील, आ- णिते आकाशाच्या एका शेवटापासून दुसऱ्या शेवटापर्यंत त्याच्या निवडल्यांस चहूकडून जमा करतील (माथी २४,२९--३१.). प्रभू स्वतां अरोळी करून मुख्य दूताच्या वाणीने आणि देवाच्या करण्याच्या नादाने आका- शांतन उतरेल, आणि खीस्ताकडील मेलेले जे ते पहिल्याने पुन्हा उठ- नील मग जे जीवंत असून राहतात ते आमी त्यांच्या संगतीं मेघांत प्रभला भेटण्यासाठी अंतराळांत हिरावले जाऊ,आणि तसे प्रभूच्या संगतीं निरंतर राह (१ थेस्स० ४,१६.१७). जसा रात्री चोर तसा प्रभूचा दिवस येईल.