पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३७६ मेलेल्यांचे फिरून उठणे. प्रक०१९८ यांत आकाश मोठ्या नादाने निघून जाईल, तवे आगीने विरघळतील, आणि पृथ्वी व तींतील कामे जळून जातील (२ पेतर ३,१०).-- "देवा- पासून आकाशांतून आनि उतरला" (असे योहान्नाने दृष्टांताने पाहिलें) "आणि त्याने दुष्टांस खाऊन टाकले. आणि म्या मोठे पांढरे आसन व त्यावर कोणी बसलेला पाहिला, त्याच्या तोडापुढून पृथ्वी व आकाश पळाले आणि त्यांचे ठिकाण सांपडले नाहीं (प्रग०२,९.११). तेव्हां जो आस- नावर बसला तो ह्मणाला पाहा, मी अवघीं नवीं करितो!" (प्रग०२१,५). प्रक०१९८. मेलेल्यांचें फिरून उठणे. जिवंतांचा पालट आणि आकाश व पृथ्वी यांचे न होणे. १. "पापाची मजुरी मरण आहे, देवाचे कृपादान तर आमच्या प्रभु येशू ख्रीस्त याकडून सर्वकाळचे जीवन आहे" (रोम०६.२३ ). खीस्त मेलेल्यांतून उठला आहे, तो निजलेल्यांतले प्रथम फळ आहे, कारण ज्यापेक्षा एका मनुष्याकडून मरण आहे, त्यापेक्षा एका मनुष्याकडून मेलेल्यांचे पुनरुत्थानही आहे" (१ करिं०१५,२०.२२ ). “आमचा प्रजा- पणा आकाशांत असतो, तेथून तारक प्रभु येशू ख्रीस्त याची आह्मी बाट पाहतो. तो आमचे नीचपणाचे शरीर असे पालटील की ते त्याच्या तेजस्वी शरीरासारखे होईल." (फिलि० ३,२०.२१). परंतु मेलेले कसे उठतात? कोणत्या प्रकारच्या शरीराने येतात? असे कोणी ह्मणेल. अरे मूर्खा, में तूं पेरितोस ते जर मरत नाही तर जिवंत केले जात नाही, आणि जें तूं पेरितोस ते जे अंग होणार, ते तूं पेरीत नाहींस, तर उघडा दाणा तो कदाचित् गव्हांचा अथवा दुसऱ्या कशाचा असो. तसे मेलेल्यांचे पुन्हा उठणेही आहे. नासकेपणांत पेरले जाते, अविनाशीपणांत उठविले जाते; अवमानांत पेरले जाते, माहात्म्यांत उठविले जाते; अशक्ततेत पेरले जाते, सामर्थ्यांत उठविले जाते; प्राणाचे शरीर पेरिले जाते, आत्मिक शरीर उठविले जाते. प्राणाचे शरीर आहे, आत्मिक शरीरही आहे. तथापि ज आत्मिक ते प्रथम नव्हते तर जे प्राणाचें ते, मग जें आत्मिक त.