पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३७४ शेवट काळच्या तारणाच्या पूर्णतेची सांकेतिक चिन्हें. [प्रक० १९६ आणि तिचे जय पावणे तिच्या स्थिरतेसाठी व वृद्धिंगत होण्यासाठी आहे, तर मग सांप्रत एथील युद्धप्रवर्तक ख्रिस्ती मंडळी जी आहे ती शेवटील जयशाली मंडळी होईल, तिसरा भाग. शेवटचा काळ.-तारणाची पूर्णता. प्रक० १९६, शेवट काळच्या तारणाच्या पूर्णतेची सांकेतिक चिन्हें. त्या दिवसाविषयीं व त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही, आका- शांतील दूतांसही नाही (मार्क १३, ३२); जे काळ व प्रसंग बापाने आपल्या स्वाधीन ठेविले आहेत, ते आह्मी जाणावे हे आह्माकडे नाही. (प्रेषि० १,७); तरी काळाची लक्षणे' समजणे हे ख्रिस्ती मनुष्यांचे कर्त्त- व्य आहे (मात्थी १६. ३ ).~ मात्थी २४, ३२ यांत प्रभु येशू ह्मणतो की, "अंजिराच्या झाडाचा दाखला समजून घ्या. त्याच्या डाहळीला रस येऊ लागला व पाने फुटूं लागलीं, ह्मणजे उन्हाळा जवळ आला, असे समजतां तसेच तुह्मी या सर्व गोष्टी पाहाल, तेव्हां तो काळ दारासी आहे असे तुह्मी समजा." सर्व राष्ट्रांस साक्ष व्हावी ह्मणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगांत गाजवितील, तेव्हां शेवट येईल ( मात्थी २४, १४ ). पौल जो प्रेषित तो ह्मणतो: "भावानो, हे गूज तुह्मास न समजावे असे नाही, की इस्राएल लोक काही अंशी जड झाले आहेत, आणि विदेशी लोकांची पूर्णता आंत येई तोवर तसेच राहतील. मग सर्व इस्राएल तारण पावेल" (रोम ० ११, २५. २६ ). खोटे भविष्यवादी व खोटे खीस्त उठतील आणि साधेल तर निवडलेल्यांस देखील फसवितील. आणि अधर्म वाढ-