पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १९५] संपूर्ण ख्रिस्ती मंडळी. ३७३ कडून मनुष्यमात्रांस आमंत्रण व्हावे; बाप्तिस्याकडून आपण खास्ताच्या शरीररूप मंडळीचे अवयव होऊन खीस्ताच्या जीवनाचे भागीदार व्हावे, आणि प्रभुभोजनाकडून आपणांस खीस्ताचे जीवन उत्तरोत्तर अधिक प्राप्त व्हावे. प्रभुभोजन संजीवनाच्या वृद्धीसाठी आत्म्याच्या पोषणार्थ आहे.--जो बापाचा महिमा तोच पुत्राचा; पुत्र जो खीस्त त्याने आका- शांत जाऊन तो महिमा परत घेतल्यानंतर पृथ्वीवर पवित्र आत्मा पाठवून दिला. तारणाच्या ज्ञानाचे मूळ व त्याचा उगम देवाचें पवित्र शास्त्र आहे, हे दाखवावे, आणि जे कोणी ख्रिस्ती मंडळींत मिळतील त्या सर्वांसाठी तारणाचे साहित्य संरक्षित ठेवून ते आपल्या सर्व लेकरांस द्यावे असी मात- पितृवत मंडळी स्थापण्याची प्रेषितांच्या अंगी शक्ति यावी ह्मणून प्रथम परम आश्चर्यकारक रीतीने खीस्ताने प्रेषितांवर पवित्र आत्मा पाठविला. संपूर्ण ख्रिस्ती मंडळी ख्रीस्ताचे शरीर आणि पवित्र आत्म्याची कारागिरी आहे. तोच पवित्र आत्मा निरंतर सर्वकाळांतून तिची पूर्णता होईपर्यंत तारणाचे साहित्य (देवाचे वचन, बाप्तिस्मा आणि प्रभुभोजन) याकडून मनुष्यांस तारण प्राप्त करून देतो, आणि हे तारण प्राप्त करून देणे पवित्र आत्म्याचें साधारण काम होय. २. असले साहित्यमय व शक्तिभरित आणि पवित्र आत्म्याने प्रेरित असणारी. आणि आपले मस्तक खीस्त याच्या संरक्षणांत व अधिकारांत असणारी जी मंडळी तिने आपली पूर्णता होण्याची वाट पाहावी. खमीर जसा उत्त- रोत्तर सगळा उंडा फुगवून त्याचा पालट करितो, तसे तारणात्मक जे गूण खिस्ती मंडळीमध्ये आहेत त्यांकडून सर्व जगाचा पालट झाला पाहिजे. भाज्यांमध्ये मोहरीचा कोंब पहिल्याने लहान व क्षुल्लक भासतो, परंतु तेच पढे मोठे झाड होते व त्याच्या फाद्यांवर आकाशांतील पक्षी देखील राहतात. त्याप्रमाणे ख्रिस्ती मंडळी वृद्धिंगत होऊन सर्व राष्ट्र व सर्व भाषांतील लोक आपल्यामध्ये मिळवून घेऊन शेवटी सर्व पृथ्वी भरील. असे होईपर्यंत ती युद्धप्रवर्तक मंडळी राहील, कारण रक्तमासाची असल्यामुळे आपल्यामध्ये पाप राहिले आहे ह्मणून त्याविरुद्ध, आणि जगाचा द्वेष व छळणूक याविरुद्ध तिला शूर होऊन युद्ध करावे लागते. परंतु देवाचा आत्मा मंडळीमध्ये प्रवत्त आहे, आणि तिचा सर्वशक्तिमान मस्तक जो खीस्त तो तिचे रक्षण करीत आहे. या कारणास्तव तिचे जे सोसणे ते तिच्या शुद्धीसाठी उपयोगी