पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३७२ संपूर्ण ख्रिस्ती मंडळी. [प्रक० १९५ देवळांत जाऊन राहिले, आणि दुसऱ्या पक्षांतील दावीदाच्या गडावर जाऊन राहिले. देवळाचा नाश होऊ नये ह्मणून टैटसाची फार इच्छा होती आणि त्याप्रमाणे त्याने हुकूमही केला होता. परंतु यहूदी लोकां- नी धैर्याने युद्ध केल्यामुळे रोमी पलटणांतील लोक फार रागावले असतां हल्ला करते वेळेस कोणी एका शिपायाने पेटलेली मशाल देवळांत टाकून दिली, तेणेकरून देऊळ पेटले, आणि जरी टैटसाने आग विझविण्यासाठी सक्तीने हुकूम केला, तरी कोणी त्याकडे लक्ष दिले नाही. अशा मोठ्या शोभा- यमान इमारतींविषयीं यहूदी लोक विलाप व आकांत करीत असतां ती अमीने भस्म होऊन गेली. नगराचा वरील भाग हस्तगत होण्यास असाध्य असल्यामुळे कित्येक दिवस नगर हस्तगत झाले नाही. शेवटी क्षुधेने त्यांतील लेक व्याकुळ होऊन बाहेर पडले, तेव्हां तेही टैटसाच्या स्वाधीन झाले. यरूशलेम शहर जमीनदोस्त झाले आणि प्रभूच्या वच- नाप्रमाणे धोंड्यावर धोंडा राहिला नाही. पंधरा लाख यहूदी या लढाईत मरण पावले. एक लाख पाडाव झाले, त्यांतील बहुत दासपणांत विकले गेले, कित्येक रोमी लोकांच्या कर्मणुकीसाठी वनपशूसी लढायास लावले असतां मरण पावले. टैटसाने इ० सन ७० व्या वर्षी जयाच्या उत्सहाने रोमांत प्रवेश केला, त्या वेळेस जयाच्या खुणेसाठी देवळांतील पुढे ठेवलेल्या भाकरीचें मेज, सोन्याची समई आणि नियमशास्त्राची वही ही पुढे चालविली. ___ प्रक०१९४. संपूर्ण खिस्ती मंडळी. १. खीस्ताने आपल्या प्रायश्चित्तरूप मरणाकडून सर्वकाळपर्यंत टिकणारे असे अपरमित पुण्य मिळविले, तेणेकरून सर्व मनुष्यांचे पाप नाहीसे होण्यास उपाय झाला, आणि आपल्या पुन्हाउठण्याकडून त्याने जीवन व अक्षयता ही प्रकाशित केली आहेत. ज्या कोणांस ते जीवन प्राप्त होते त्यांस नवीन आत्म्याने पवित्रपणांत आपले आयुष्य घालविण्याची शक्ति मिळती. मनुष्यमात्रांचे तारण होण्याकरितां देवाने तर सर्व सिद्धता केली, पण आतां जे राहिले ते हेच की, खीस्ताकडून सिद्ध झाले- लें जैतारण ते सर्व मनुष्यांस प्राप्त झाले पाहिजे, याजकरितां पृथ्वीपासून वर जाण्याच्या अगोदर खीस्ताने शुभवर्तमानाची सेवा आणि संस्कार यांची स्थापना केली. तारण पावण्याकरितां शुभवर्त्तमान गाजविण्या-