पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १९४] जुन्या कराराच्या लोकांवर शासन. ३७१ बंड केले. सु-या प्रांतावरील गवरनर जेस्त्यस गालस तो बंड मोडायाला फौज जमा करून यरूशलेमावर आला. परंतु त्याचा अगदी पराजय होऊन तो माघारा गेला. त्यावर नेरो जो कैसर (बादशाहा) त्याने वेस्पास्थान नामक मोठा शूर व लढाऊ सेनापति याला यहूदा देशास पाठविले, त्याने गालील प्रांत घेऊन त्याचा नाश केला. त्यावरून यहूदी लोक भांबावल्यासारखे होऊन त्यासी युद्ध करू लागले. परंतु वेस्पास्यान याने एकामागे एक असीं नगरे घेऊन शेवटी यरूशलमासमोर येऊन तळ दिला. यरूशलेमास वेढा घालण्याची तयारी करीत असतां आपण कैसर झालो, ही बातमी समजल्यामुळे त्याला ताबडतोब रोमास जाण्याचे अगत्य पडले. तेव्हां त्याचा पुत्र टेटस याने त्याचे काम चालविले. त्याने यरू- शलेमाला वेढा घातला, त्या वेळेस वल्हांडण सणाचे दिवस असल्यामुळे शहरामध्ये मनुष्यांची अतिशय गर्दी झाली होती. शजूंनी आपल्या स्वाधीन व्हावे ह्मणून टैटसाने सौम्य रीतीने त्यांस पहिल्याने सांगितले असता त्याचा त्यांनी उपहास व तिरस्कार मान केला. तेव्हां आपले बोलणे मान्य करावे ह्मणून टेटसाने क्रूर व कठोर उपाय केले. यहूदी बंदीवानांपैकी हजारो बंदीवानांस त्याने खांबी दिले. तेणेकरून जिकडे तिकडे खांब लागून राहिले होते. शेवटी असे झाले की, खांबांसाठी जागा व लांकड राहिले नाही. शहरांत कांहीं अन्न न राहिल्यामुळे लोक भुकेने पीडित होऊन अतिशय त्रास पावले. एका भाकरीच्या तुकड्यासाठी मित्राने मित्राचा जीव घ्यावा, गवत व कचरा खाऊन पोटाची शांति करावी. ढालीची कातडी देखील चाचावी, असा क्रम चालला. कोणी एक संभावित यहूदीण होती, तिने तर क्षुधेने व्याप्त होऊन आपले पोट, लेकरूं कापून खाले. सहस्रावधी लोक क्षुधेने मरण पावले. कित्येकांनी निराश होऊन कोठाच्या भिंतविरून उड्या टाकल्या. त्या समयीं बंडा. च्या मुख्य सरदारांमध्ये वैमनस्य पडले, आणि ते परस्पर युद्ध करून प्राण घेऊ लागले. आपण रोमी लोकांच्या स्वाधीन व्हावे ह्मणजे आपला प्राण वांचेल, असे जर कोणी सुचवू लागले तर त्याचा लागलाच जीव घेत. सहा लाख प्रेत भिंतीवरून खंदकांत टाकून दिली, तणेकरून खंदक भरून गेला. मग टैटसाने शहरच्या तटावरून हला करून खालचे नगर घेतले. त्यानंतर एका पक्षांतील यहूदी लोक आपल्या संरक्षणाकरितां