पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३७० जुन्या कराराच्या लोकांवर शासन, प्रक० १९४ पासून दूर झाल्यावर पेतर जो प्रेषित त्याने बाबेलांतून तिकडे दोन पत्रे लिहिली. पोल विदेशी लोकांसाठी प्रेषित असतां त्याने विदेश्यांस जो उप- देश केला, त्याच्या खरेपणाविषयीं यहूदी लोकांवरील प्रेषित जो पेतर, तो साक्ष देतो, आणि त्यांनी दृढ भावाने स्थिर राहावे ह्मणून बोध करितो. आपल्या दुसऱ्या पत्राच्या तिसऱ्या अध्यायांत ख्रीस्ताच्या परत येण्याच्या वेळेस अग्नी- च्या योगाने (प्रक० १९८ क ०२.) आकाश व पृथ्वी यांचे तेजस्वी रूपांतर होईल असें तो शिकवितो.- योहान्न याने तीन पत्रे लिहिली. त्याचे पहिले पत्र बहुतकरून आश्या मैनरांतील मंडळ्यांला लिहिले असावे. त्यांत त्याने फार सौम्य रीतीने पण खोचण्यासारखा मतलब लिहून दाख- विले की, नीस्तासी आणि खिस्ती भावांसी पूर्णपणाने प्रीतियुक्त संगत पा- वणे हे ख्रिस्ती मनुष्यांचे अनुसंधान असावे. दसरे व तिसरे पत्र मंडळींती- ल कोणा दोघां मनुष्यांस लिहिली आहेत, त्यांचा अर्थ पहिल्या पत्राप्रमाणे आहे.-याकोबाचें पत्र, यरूशलेमांतील मंडळीचा अध्यक्ष याकोब (प्रक० १८३ क ०१) याचे पत्र इस्राएलांतील बारा वंशांपैकी ख्रिस्ती लोकां. साठी लिहिले आहे. यांत जो विश्वास पवित्रतेची फळे उत्पन्न न करितां निर्जीव राहतो, त्याविषयी निषेध केला आहे.-यहूदाचें पत्र, यांत दुष्ट व उन्मत्त ठकांविषयीं संभाळावे ह्मणून उपदेश केला आहे.- नव्या करारांतील शेवटचे प्रगटाविणे' नामक पुस्तक भविष्यग्रंथ आहे. त्यांत पृथ्वीवरील जें देवाचे राज्य, त्याची वृद्धि व पूर्णता होण्याचा इतिहास याविषयीं दृष्टांत दाखविले आहेत. योहान्न जो प्रेषित त्याने आत्म्याने युक्त असतां पात्मस नाम बेटावर देशपार होण्याच्या वेळेस ते दृष्टांत पाहिले आहेत. प्रक° १९४. जुन्या कराराच्या लोकांवर शासन, प्रभु खीस्ताने यरूशलेमावर येणान्या न्याय व शासन यांच्या काळाविषयीं (प्रक० १४६ क० २.) भविष्य सांगितले. आणि तो काळ आपणांवर व आपल्या लेकरांवर यावा असे यहूदी लोकांनी आपणांला योग्य करून घेतले हति (प्रक० १५९क० २). तो काळ शेवटी अप्रतिबंधक रीतीने त्यांजवर आला. सुभेदार गेस्यस कोरस याने, पूर्वी जे अधिकारी होते, त्यांपेक्षा यहूद्यांवर अधिक बलात्कार करून त्यांस फार त्रास दिला. यावरून असे झाले की, सन इ० ६६ व्या वर्षी यहूदी लोकांनी रोमी सरकारावर