पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६८ नव्या करारांतील पुस्तकांविषयी.- चालू. प्रक० १९३ शुभवर्तमानाचा ग्रंथ कोणी ध्यफिल नामक संभावित रोमी गृहस्थ होता, याला नजर केला. स्त्रीस्ताची जी कृत्य व भाषणे पापी लोकांवर त्याची करुणा आणि क्षमा करण्याविषयी प्रीति दाखवितात, आणि विदेशी लोक शुभवर्तमानाचे भागीदार होण्याकरितां बोलाविलेले आहेत, हे ज्यांवरून दिसून येते, असे त्या ग्रंथांत वेचे घेतले आहेत. योहान्न याने आपले शुभवर्तमान सर्वांच्या मागून लिहिले आहे. आणि ज्या भाषणांवरून व कृत्यांवरून खीस्ताचा ईश्वरी स्वभाव दिसून येतो, आणि कृपेने व सत्यतेने पूर्ण असतां बापाचा तो एकुलता पुत्र आहे याविषयी विशेष कथन करून वरकड तीन शुभवर्तमानाच्या पुस्तकांची पुरवणी केली आहे. प्रेषि- तांच्या कृयांचे पुस्तक सुवार्तीक लूका याने रचिले. या पुस्तकांतील पहिल्या बारा अध्यायांत यरूशलेमांतील मूळमंडळीची स्थापना तिचे वर्णन आहे; आणि तेथून पुढे पोल प्रेषित याचे शुभवर्तमान गाजविण्याचे काम याविषयीं वर्णन आहे. प्रक० १९७. नव्या करारांतील पुस्तकांविषयों.-चालू. १. सर्व प्रेषितांहून पोलाने जसा तोंडाने उपदेश करून आपले काम अधिक श्रमपूर्वक केले तसा ग्रंथरूपाने लिहिलेला बोधही त्यापासून आधिक प्राप्त झाला. नव्या करारांत त्याची चौदा पत्रे आहेत, त्यांपैकी कांहीं पत्रे निराळ्या मंडळ्यांस व कांहीं कोणी विशेष मनुष्यांस लिहिली आहेत.- १. रोगकरांस पत्र, देवासमोर येशू ख्रीस्तावरील विश्वासाने मात्र पापी न्यायी ठरतो, हा खिस्ती धर्मातील मूळ व मुख्य सिद्धांत आहे, तो पौलाने या पत्रांत सविस्तर व अगदी स्पष्ट करून दाखविला आहे, या करितां हे पत्र नव्या करारांतील मुख्य भाग असें मानिले पाहिजे.-२.व ३. करियकरास दोन पत्रे. करिंथांतील मंडळीचा निरोप घेऊन पौल तेथून गेला (प्रक० १८६.) त्यानंतर त्या मंडळींत अनेक प्रकारे अव्यव- स्था आणि फूट ही उत्पन्न झाली, त्याविषयी त्याने आपल्या पत्रांत त्यांचा निषेधव त्यांस बोधही केला आहे. अणखी त्याच पत्रांत त्याने प्रभुभोजनावि- षयी (१ करिं० १०, ११), ख्रिस्ती लोकांच्या प्रीतीच्या लक्षणांविष- यी(१ करिं० १३. ) आणि देहाच्या पुन्हा उठण्याविषयी ( १ करिं० १५.) परिपूर्णपणे बोध केला, यावरून आमी त्याचे फार आभारी अस-