पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १९२] नव्या करारांतील पुस्तके. पवित्र आत्म्याच्या प्रकाशविण्याने प्राप्त झाले त्याविषयी सर्वकाळ लिहून ठेव- लेली साक्ष असावी, ह्मणून ग्रंथही रचिले आहेत, आणि ते ग्रंथ सर्वकाळ- पर्यंत ख्रिस्ती लोकांस धर्मज्ञान मिळविण्यासाठी जिवंत झराआणि आपल्या विश्वासासाठी स्थिर व न डगमगणारा पाया असे आहेत. या आयुष्यां- तून आपली वर्तणूक कसी असावी याविषयी ते ग्रंथ उजेड व मार्गसूचक असे आहेत. आणि तारण संबंधी खरे मत काय आहे, आणि नाशकारक पाखंड मत काय आहे याची परीक्षा करण्यासाठी ताजवा असेही आहेत. रोम० १०,१७: "विश्वास संदेश ऐकण्यावरून होतो,आणि उपदेश ऐकणे देवाच्या वचनावरून" देवाचे वचन तर पवित्र शास्त्र आहे. जरी ते मनुष्यांकडून रचिले गेले, तरी ते देवाचे वचन आहे, कारण की त्यांनी आपले मानवी शहाणपण त्यांत लिहून ठोविले असे नाही. तर जे ज्ञान त्यांस देवाने दिले होते ते त्यांनी त्यांत लिहून ठविले आहे. गल. १.११.१२: "तर भावानो मी तुह्मास कळवितों की जी सुवार्ता म्या सांगि- तली ती माणसाप्रमाणे नव्हे, कां तर ती मला माणसांपासून प्राप्त झाली नाही, आणि मला शिकविलीही नाही, परंतु येशू ख्रीस्ताच्या प्रगट करण्याकडून मला समजली.-१ कार० २,१२,१३: “आह्मास जगाचा आत्मा मिळाला नाही, तर जो आत्मा देवापासून आहे तो, यासाठी की देवाने जी आह्मास कृपेने दिली ती आह्मी जाणावी तीच आह्मी सांगतो. मानवी ज्ञानाच्या शिकविलेल्या शब्दांनी नाही तर पवित्र आत्म्याच्या शिकविलेल्या शब्दांनी सांगतो." २. मात्थी, मार्क, लुका आणि योहान यांकडून शुभवर्तमानाची जी चार पुस्तके आहेत त्यांत येशूचे चरित्र लिहिले आहे. मात्थी व योहान्न हे येशूचे शिष्य आणि प्रेषित असतांना त्यांनी जे कथन केले, त्याचेते प्रत्यक्ष पाहणारे होते. दुसरे दोघे मार्क व लूका यांनी प्रत्यक्षदर्शी होते, त्यांज- पासनजे समजून घेतले होते, त्याचे कथन केले (लूक ०२,३). बार्णबाचा भाचा मार्क, हा पेतर जो प्रेषित याचा शिष्य व सोबती होता, आणि लका हा पोल प्रेषिताचा सोबती होता. मात्थी याने आपले शुभवर्त- मान यहूदी लोकांसाठी लिहिले आहे, आणि त्यांत येशू हा खरोखर वचन लिला मशीहा आहे, याविषयीं मुख्य प्रमाण पटविले आहे. मार्काने विकरून येशूच्या कृत्यांचे वर्णन केले आहे. लूका याने आपला