पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अब्रामाचा विश्वास. [प्रक० ०१ आकाशाकडे पाहा, आणि तुझ्याने तारे मोजवतील तर मोज, असे तुझें संतान होईल." तेव्हां अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेविला, आणि हा त्याने त्याला न्यायीपण असा मोजला :).

  • ) कोण जाणे, कदागोमर येऊन आपला सूड उगवील असा विचार मनांत आणून

अत्रामाला भय वाटले असेल. याशिवाय तो अझन निःसंतान असल्यामुळे फार खिन्न होता, या कारणास्तव देवाने त्याला एवं आश्वासन दिले. 1) जेव्हांपासून माणूस पापांत पडला, तेव्हापासून तो आपणाकडून किंवा आपल्या क- मीच्या योगाने न्यायी ठरूं शकत नाही. परंतु देवाने योजलेला तरणोपाय विश्वासाने घेऊन न्यायी ठरतो. अब्रामाच्या वेळेस तारण केवळ वचनरूपी दिले होते, आणि अवामाने त्या वचनावर भाव ठेविला, तो त्याला न्यायीपण असा मोजला गेला आणि तसा अवाम विश्वासणान्यांचा वाप असा झाला. २. आणि अब्रामाची बायको सारय लेकरूं प्रसवली नाही. आणि तिची हागार नामें कोणी मिजरी दासी होती तिजपासून संतान उत्पन्न व्हावे ह्मणून अब्रामाने ती उपपत्नी करावी, असे सारय इने अब्रामापासून मागितले *). परंतु हागार इच्या दृष्टीने तिची धनीण तुच्छ झाली, तेव्हां सारय तिला गांजू लागली, मग तिच्या समोरून ती पळाली. नंतर रानांत ती परमेश्वराचा दूत |) याला अढळली. तेव्हां तो ह्मणालाः "तूं आपल्या धनिणीकडे परत जा, आणि तिच्या हाताखाली सोसून घे. पाहा, तूं पुत्र प्रसवसील आणि त्याचे नांव इश्माएल ठेवसील. तो वन- चर माणूस होईल. त्याचा हात सर्वांच्या विरुद्ध आणि सर्वांचा हात त्याच्या विरुद्ध होईल. तुझे संतान मी फारच वाढवीन, ते पुष्कळपणामुळे मोजवणार नाही." नंतर हागार परत गेली, आणि ती अब्रामाला इ- श्माएल प्रसवली, तेव्हां तो ८६ वर्षांचा होता.

  • ) जी वचने देवापासून मिळाली होती त्यात सारयेपासून संतान होईल असे स्पष्ट

सांगितले नव्हते. यासाठी आपल्या दासीकडून संतान करून घ्यावें, झणजे तिची जी लेकरें ती आपलीच मोजीन, असी योजना सारय ईने केली. अनेक बायका करणें । देवाच्या नियमाविरुद्ध आहे, आणि ही चाल काइनातील संततनि प्रथम सुरू केली (प्र- क०४.२). अब्रामाच्या दिवसांत ही चाल इतकी साधारण चालू होती की, त्याचा दोष अब्रामाला देखील वाटला नाही. परंतु पुढील परिणाम स्पष्ट दाखवितो की सारय ईची योजना केवळ स्वच्छंदाची असून देवाच्या नेमाविरुद्ध होती.