पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६६ नव्या करारांतील पुस्तकें. प्रक० ५९२ आणि शेवटीं जाते समयीं त्या मंडळीवर जो मुख्य पाळक होता त्याच्या साधीन त्याला केले. पुढे या तरुणाने दुष्टांची संगत धरल्यामुळे तो केवळ आळसी व सर्व प्रकारे दुर्व्यसनी होऊन एका लुटान्यांच्या टोळीचा सरदार झाला. काही वर्षांनी योहान्न फिरून त्या मंडळीकडे गेला, आणि त्या पाळकापासी आपला पुत्र परत मागितला, तेव्हां तो कष्टी होऊन व सुसकारा टाकून अश्रु गाळीत ह्मणाला की "तो मेला आहे." प्रोषि- ताने मटले: “ तर मग त्याच्या कबरीकडे मला ने." त्यावर तो पाळक ह्मणाला: "अहाहा हे साध्य असते तर बरे असते! कारण की देहाप्रमाणे जिवंत असतां देवाविषयी व सर्व जे उत्तम त्याविषयीं तो मेला आहे." मग सर्व वृत्तांत समजून वृद्ध प्रेषित एकटाच ज्या भयंकर रानांत तो होता तिकडे गेला. तेथे लुटारू लोकांनी त्याला धरल्यावर त्याने सांस विनंती करून मटले: “ मला तुह्मी आपल्या सरदाराकडे न्या!" परंतु सरदाराने जेव्हां त्याला आपणाकडे येतां पाहिले, तेव्हां तो अतिशय लज्जा पावून प- ळू लागला. तरी योहान त्याच्या मागेधावून त्याला हाका मारून ह्मणाला की: "शस्त्ररहित व वृद्ध आपल्या बापापासून कां पळून जातोस ? भिऊ नको, तुजविषयीं अझून आशा आहे, विश्वास मात्र धर; कारण की, खीस्ताने मला तुजकडे पाठविले आहे." हे ऐकून तरणा थरथरा कांपून उभा रा- हिला आणि अतिशय कष्टी होऊन रडू लागला. तेव्हां योहान्नाने त्याच्या गळा मिठी घालून मंडळीजवळ त्याला आणले, आणि तो खरोखर प्रभु- कडे फिरला तोपर्यंत त्याने त्याला बोध करण्याचे सोडले नाही.—पोहा- नाचा अंतकाळ समीप आला, तेव्हां त्याच्याने ख्रिस्ती मंडळ्यांत जाववेना. तरी त्याला ते उचलून नेत असत, आणि जरी त्याला फार बोलायाचे साम- र्थ्य नव्हते, तरी तो "लेकरानो एकमेकांवर प्रीति करा!" हे शब्द त्यांसी बोलत असे. सूचना. वरकड प्रेषितांच्या कामाविषयी काही निश्चय करवत नाहीं. प्रक० १९2. नव्या करारांतील पुस्तकें. १. प्रेषितांनी केवळ तोडाने उपदेश करून व शिकवून सर्व राष्ट्रां- तील मनुष्यांस देवाच्या राज्यासाठी मिळवायास प्रयत्न केला असे नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरिलेले असतां तारणाचे ज्ञान, जे ईश्वरी कृपेने आणि