पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १९१] प्रेषितांचा शास्त्राबाहेरील काही इतिहास. ३६५ प्रक०१९१. प्रेषितांचा शास्त्राबाहेरील कांही इतिहास. १ पोल रोमांत काही वर्षे कैदेत राहिल्यानंतर इसवी सनाच्या ६४व्या वर्षी नेरो नामें कैसराकडून त्याचा शिरच्छेद झाला.- पेतर शेवटी विशेषेकरून बाबेलांत शुभवर्त्तमानाचे काम करीत होता. तोही जसे प्रभूने त्याला पूर्वी सांगितले होते (प्रक० १६७ क० २) त्याप्रमाणे रोमांत सन ६४ व्या वर्षांत खांबी मरण पावला. याकोब जो धाकटा यरूशले- मांतल्या मूळमंडळीवर नेहेमी पाळक होता. त्याने फार झटून आपले काम केले आणि आपल्या शुद्ध व निर्दोष वर्तणुकीकडून सर्व लोकांमध्ये "न्यायी" हे नांव प्राप्त करून घेतले. यहूदी लोकांसाठी प्रेषित असतांना त्याने मोशे याचे विधिशास्त्र पाळिल्यामुळे यहूदी लोक देखील त्याचा फार सन्मान करीत. परंतु जेव्हां पौलाने कैसराकडे चौकसी मागून न्याय- सभेच्या हातांतून आपली सुटका करून घेतली, तेव्हां न्यायसभेचा त्यावर फार रोष झाला. वल्हांडण सणाच्या दिवसांत प्रमुख याजकाने त्याला देव- ळाच्या कंगोन्यावर नेऊन तेथून त्याने सर्व लोकांसमोर खीस्ताला शाप द्यावा ह्मणून आज्ञा केली. पण त्याने शाप देण्याबद्दल त्यावरील आपल्या विश्वासा- विषयीं धैर्याने साक्ष दिल्यामुळे त्यांनी त्याला तेथून खाली ढकलून धोंड- मार केला. तेव्हा त्याने "हे प्रभू देवा, बापा, आपण काय करितो हे ते समजत नाहीत, ह्मणून त्यांसाठी विनंती करितो." असी प्रार्थना करीत असतां त्याने आपला प्राण सोडला. २. प्रेषितांपैकी योहान्न मात्र फार वृद्ध होऊन स्वाभाविक मरणाने मेला. पौल खीलाच्या शुभवर्तमानाकरितां मारला गेल्यावर आश्या मैनरांतील मंडळ्यांवर कोणी प्रेषित नसल्यामुळे योहान्न एफसांस जाऊन राहिला. यरूशलेमावर जो शासनाचा समय आला (प्रक० १९४) त्या- नंतर देखील तो जिवंत होता. तो दोमीज्यान नामें कैसर याच्या अधि- कारांत पात्मस नामक बेटांत देशपार केला होता, तेथून सुटका पावून परत आल्यावर त्याने पुन्हा एफसांत जाऊन आपल्या अंतकाळपर्यंत तीस वर्षे काम केले. एका दिवसीं तो एफसाहून आसपासच्या मंडळ्यांची देखरेख करण्याकरितां निघाला असतां एक सौम्य मनाचा व सदाचारी तरुण मनुष्य त्यास भेटला. त्यावर पुत्राप्रमाणे त्याने अतिशय ममता केली.