पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६४ रोम एथें पौलाचे जाणे. प्रक० १९० अन्न खाले. मग दिवस उगवल्यावर त्यांनी देश ओळखला नाही. मग दोहों प्रवाहांच्या संगमांत पडून त्यांनी तारूं तळास लागावे असे केले, आणि नाळ रुतून गच्च बसली, पण वराम लाटांच्या जोराने फुटून गेले. शिपायांनी तर मसलत केली की बंदीवानांस मारून टाकावे, नाहीतर कोणी पोहून पळून जाईल. पण पौलाला वांचवावे असे मनांत आणून शतपतीने त्यांच्या बेतास आडवे येऊन आज्ञा दिली की, ज्यांस पोहता येते त्यांनी पहिल्याने उडी टाकून कांठास जावे; आणि जे राहिले ते कोणी फळ्यांवर व कोणी तारवाच्या तुकड्यांवर बसून जावे. याप्रमाणे होउन सर्व कांठास सुरक्षित पोहंचले. २. तेव्हां बेटाचे नांव मलिते (मालदा) आहे, असे त्यांस समजले. रानटी लोकांनी तर आह्मावर असाधारण उपकार केले, कांतर पाऊस व गारठा पडल्यामुळे त्यांनी आगटी पेटविली. मग पोल काडके जमा करून आगटीवर घालीत होता, तेव्हां गरमीमुळे फुरसे निघून त्याच्या हातास झोंबून राहिले. रानटी लोकांनी किरडू त्याच्या हाताला लटकलेले पाहून एकमेकांस मटले: “खरोखर हा माणूस घातक आहे. हा समु- द्रांतून पार पडला तरी न्याय याला वाचू देत नाही.” परंतु त्याने किरडूं अग्नीत झटकून टाकले. पण तो मुजावा अथवा अकस्मात् मरून पडावा असी त्यांनी वाट पाहिली, परंतु त्याला कांहीं अपकार झाला नाही असे पाहून ते "हा देव आहे" असे ह्मणाले. पबलिय नामें त्या बेटाचा सर- दार त्याची शेते त्या ठिकाणी होती. त्याने त्यांस बोलावून तीन दिवस मेहेरबानीने पाहुणचार केला. पबलियाचा बाप तर दुखणाईत होऊन पडला होता. त्याकडे पौलाने जाउन प्रार्थना केली व त्याजवर हात ठेवून त्याला बरे केले. हे झाल्यावर बेटांत दुस-या लोकांस रोग होते तेही याजकडे येऊन बरे झाले. मग तीन महिन्यांवर तारवावर बसून ते रोमाकडे जायास निघाले. नंतर रोमास पोहंचल्यावर पौलाला परवानगी होती की, त्याचा राखणारा शिपायी याच्यासंगती त्याने निराळे राहावे. तसे पौल आपल्या भाड्याच्या घरी पूर्ण दोन वर्षे राहिला. आणि कोणी न अडवितां पूर्ण प्रशस्ततेने त्याने देवाचे राज्य गाजविले.