पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १९०] रोम एथे पोलाचे जाणे, ३६३ प्रक०१९०. रोम एथें पौलाचे जाणे. (प्रेषि० २७ व २८.) २. नंतर इतली देशास जलमार्गाने जाण्याचे ठरल्यावर त्यांनी पोल व दुसरे कित्येक बंदीवान यांस पलटणीचा शतपति युल्य नावे याच्या स्वाधीन केले. तो पोलासी सुजनतेने वर्तला. तर बहुत वेळ झाल्यामुळे समु- द्रावरून जाणे हे संकटाचें, (हिवाळा जवळ आला असून तुफान होत असे) मागून पौलाने हिवाळा आहे तोपर्यंत क्रेता या बेटांत राहावे ह्मणून त्यास सूचना केली. तथापि पौलाने सांगितले त्यापेक्षा तांडेल व तारवाचा धनी यांचे शतपतीला खरे वाटले, आणि तेथून पुढे जावे असी बहुतेकांना मसलत दिली. पण थोड्या वेळानंतर तुफानाचा वारा सुटला. तेव्हां तारूं भाटीवर पडायाचे त्यांस भय वाटून त्यांनी शीड उतरून ते तसेच चालं दिले. मग वादळाने त्यांचे फार हाल होत असतां त्यांनी दुसऱ्या दिवसीं भरगत टाकून दिली, आणि तिस-या दिवसी यांनी तारवाची दोरखंडे काढून टाकली. आणि बहुत दिवस सूर्य व तारेही दिसेनात त्यामुळे शेवटी आमची तरण्याची आशा अगदी नाहींसी झाली. तेव्हां पोल त्यांच्यामध्ये उभा राहून ह्मणाला : “अहो माणसानो, तुह्मी माझे ऐकायाचे होते, क्रेतेहून निघायाचे नव्हते; आणि आतां मी तुह्मास सांगतो की धैर्य धरा, कारण तुह्मांतील कोणाच्याही जिवाचा नाश होणार नाहीं, तथापि तारवाचा होईल. कांतर ज्याची सेवा मी करतो त्या देवाचा दूत गेल्या रात्री मजसी उभा राहून ह्मणाला: 'पौला, भिऊ नको, कैसरापुढे तुला उभे राहिले पाहिजे, आणि पाहा, तुजबरोबर जे तारवांत बसले आहेत ते अवघे देवाने तुला दिले आहेत. यास्तव मनुष्यानो, धैर्य धरा, कांतर माझा देवावर भरवसा आहे की, जसे मला त्याने सांगितले त्याप्रमाणेच घडेल, पण आमाला एखाद्या बेटावर पडावे लागेल.' मग दिवस उगवणार होता तेव्हां पोल सर्वांस अन्न खाण्याची विनंती करून ह्मणालाः "आज चौदा दिवस तुह्मी उपासी राहिला आहां, कांहीं खाले नाही, यारलव मी विनवितों की अन्न खा, कां की तुह्मांतील को- णाच्या डोक्याच्या केसाला धक्का लागणार नाही." हे पटल्यावर त्याने भाकर घेऊन त्या अवघ्यांसमोर देवा वा आशीर्वाद मागितला, आणि तो खाऊ लागला. मग ते सर्व वस्यचित्त झाले, आणि त्यांनीही काही