पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६२ कैसरियांत पौलाचे कैदेत राहणे, प्रक० १.८९ रले: “यरूशलेमास जाऊन तेथे माझ्यासमोर या गोष्टींची चौकस व्हावी, असी तुझी इच्छा आहे काय?" तेव्हां पौलाने मटले: “कैसराच्या न्यायासनापुढे मी उभा आहे, एथे माझी चौकसी झाली पाहिजे. मी कैसराकडे चौकसी मागतो. तेव्हां फेस्ताने उत्तर दिले की: "कैसराकडे चौकसी मागितलीस तर कैसरापासीं जासील." मग काही दिवस झाल्यावर अग्रिप्पा राजा जो दुसरा (प्रक०९८ क०२) तो व त्याची बहीण बरनीके हीं फेस्ताची भेट घ्यायासाठी कैसरियास आली, तेव्हां फेस्ताने राजाजवळ पोलाची गोष्ट काढली. तेव्हां अग्रिप्पाने झटले: “त्या माणसाचे ऐकावे असे माझ्याही मनांत आहे." त्याने ह्मटले: "उद्यां त्याचे ऐकसील.” तर दुसऱ्या दिवसी आग्रिप्पा व बरनीके हीं मोन्या समारंभाने दरबारांत गेली. आणि फेस्ताने पौलाला आणविले. मग आग्रप्पाने पोलाला झटले : “तुला आपणासाठी बोलायास परवानगी आहे.” तेव्हां पौलाने आपल्यापूर्वीची चाल कसी होती, दमसेकास जाण्याच्या वेळेस रस्त्यावर चमत्कारिक रीतीने आपला पालट कसा झाला व विदेशी लोकांमध्ये आपला उपदेश काय याविषयीं, आणि ख्रीस्ताचे दु:ख सोसणे आणि मेलेल्यांतून उठणे यांविषयी सविस्तर वर्णन केले. तेव्हां फस्ता मोठ्याने बोलला : “पौला, वेडा झालास ! तुला बहुविद्येने वेडे केले आहे!" पण तो ह्मणाला : “फेस्ता महाराज, मी वेडा झालो नाही, तर सत्याच्या व सुज्ञतेच्या गोष्टी बोलतों. राजाला तर या गोष्टींविषयी ठाऊक आहे, आणि त्यासमोर मी प्रशस्त बोलतों, कांकी यांतले काही त्याजपासून लपले नाही. असी माझी खातरी आहे, कांतर हे कोपऱ्यांत घडले नाही. अग्रिप्पा महाराज, भविष्यवाद्यांवर आपला विश्वास आहेना ! विश्वास आहे हे मला ठाऊक आहे." अग्रिप्पाने मटले: "मी थोडक्याने ख्रिस्ती होईन असे तूं मला मानवतोस." पोल मणाला : "तूं केवळ नव्हे, तर हे अवघे जे आज माझे ऐकतात ते या बंधनाशिवाय माझ्यासारखे असावे, असे देवापासी मी प्रार्थितो." तेव्हां राजा व सुभेदार व बरनीके ही उठली आणि एकीकडे जाऊन एकमे- कांस ह्मणाले: “या माणसाने मरणास किंवा बंधांस योग्य असे कांहीं केले नाही, त्याने कैसराकडे चौकसी मागितली नसती तर त्याला मोकळे करायास ठीक पडले असते."