पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १८९] कैसरियांत पौलाचे कैदेत राहणे. ३६१ परंतु पोलाचा भाचा याने कटाविषयीं वर्तमान ऐकल्यावर गढीत येऊन पौलाला सांगितले. मग पौलाने एका शतपतीला बोलावून झटले: “या तरण्याला सरदाराकडे घेऊन जा." नंतर त्या तरण्यापासून सरदाराला त्यांचा कट समजल्यावर त्याने दोनशे शिपायी तयार करवून सर्व हकिकती- बद्दल पत्र देऊन प्रहर रात्रीस पौलाला त्यांजबरोबर फेलीक्ष नामक सुभे दाराकडे कैसरियास पाठविले. प्रक० १८९. कैसरियांत पौलाचें कैदेत राहणे. (प्रेषि०२४- २६.) १. मग सुभेदाराने पत्र वाचून पोलाला मटले: “तुझे वादीही समक्ष होतील तेव्हां मी तुझे ऐकून घेईन." आणि सरकारी वाड्यांत त्याला राखावें असी त्याने आज्ञा केली. मग पांच दिवसांनंतर प्रमुख याजक अनान्या, वडील व कोणी एक वक्ता तर्तुल यांसहित खाली आला, आणि हा नाजोरी लोकांच्या पंथाचा पुढारी आहे, आणि हा देऊळ विटाळायाला पाहत होता असा दोषारोप पोलावर सुभेदाराला दाखविला. परंतु पौलाने प्रत्युत्तर दिल्यावर फेलीक्षाने यहूद्यांस मटले की : "लुसिय सरदार येईल, तेव्हा तुमचे प्रकरण पुर्तेपणी जाणेन." आणि पौलाला मोकळे राखावे आणि त्याच्या स्वकियांस त्याची सेवा करण्याची किंवा यांकडे येण्याची मनाई करूं नये, असी त्याने शतपतीला आज्ञा केली.- मग काही दिवसांनंतर फेलीक्षाने आपली बायको गुसिला यहूदीण होती तीसहित येऊन पौलाला खीस्लावरल्या विश्वासाविषयी बोलतां ऐकिलें. तो तर नीति व इंद्रियदमन व होणारा न्याय यांविषयी बोलत असतां फेलीक्ष भयभीत होऊन ह्मणालाः "आतां तूं जा, संधि पाहून तुला बोलावीन." अणखी त्याने आशाही धरली की, पौल आपली सुटका म्या करावी ह्मणून मला द्रव्य देईल. परंतु दोन वर्षे भरल्यानंतर फेलीक्षाच्या बदलीवर पर्कय फेला आला. .२. मग फेस्ताने सुभ्यावर आल्यावर न्यायासनावर बसून पौलाला आणायाची आज्ञा केली. मग यरूशलेमाहून आलेले जे यहूदी त्यांनी. ज्यांचा पुरावा त्यांच्याने करवेना असे बहुत व भारी दोष पौलावर ठेवले. पण फेस्ताने यहूद्यांची मर्जी संपादावी असे मनांत आणून पौलाला विचा- 46H