पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६० यरूशलेमात पौलाचें पराधीन होणे. प्रक० १८८ केली. ती मिळाल्यावर पौलाने पाय-यांवर उभे राहून इब्री भाषेत त्यांसीं बोलूं लागला. इबी भाषेत तो बोलत आहे असे ऐकून ते स्वस्थ झाले. तेव्हां मी नियमशास्त्राभिमानी असतांना ख्रिस्ती लोकांचा मोड कसा करीत होतो, दमसेकास जातांना रस्यांवर प्रभु कसा दिसला, आणि सुवार्ता सांगायाला दूर विदेशी लोकांकडे प्रभूने मला कसे पाठविले, हे अनुक्रमाने पोलाने त्यांस दाखविले. त्याचे हे ऐकल्यावर ते मोठ्याने ओरडून बोललेः “याला पृथ्वीवरून काढून टाक, कां की हा वांचायास योग्य नाही." तेव्हां सरदाराने त्याला गढीत आणायाची आज्ञा दिली आणि कोणत्या कारणाने ते त्याजवर असे ओरडतात हे जाणण्यास याला फटके मारून विचारपूस करावी ह्मणून सांगितले. मग पौलाने मटले: “रोमी मनुष्य व अन्यायी न ठरलेला याला फटके मारायाला तुह्मास अधिकार आहे काय?" है ऐकून लागलेच जे त्याचा तपास कर- णार होते ते त्याला सोडून गेले, सरदारही हा रोमी आहे असे जाणून भ्याला, कांकी त्याने त्याला बांधले होते. २. मग दुसऱ्या दिवसीं ज्याचा आरोप यहूदी लोकांनी त्याजवर आणला स्याचा निश्चय जाणावा असे सरदाराच्या मनांत होते, ह्मणून त्याने त्यांची अवघी सभा यांस मिळण्याची आज्ञा करून पोलाला त्यांपुढे उभे केले. तेव्हां पोल सभेकडे दृष्टि लावून ह्मणाला: "मी आजपर्यंत पूर्ण सद्भावे- करून देवासी वर्तलो." है ऐकून प्रमुख याजक अनान्या याने त्याजव- ळच्या उभे राहणान्यांस त्याच्या तोंडांत मारावे ह्मणून आज्ञा केली. त्यांचा तर मोठा कलह लागल्यावर ते पौलाला फाडून टाकतील, असे भय धरून त्याला त्यांमधून काढून गढीत आणावें ह्मणून सरदाराने शिपा- यांस आज्ञा केली. त्याच रात्री प्रभु त्याजवळ उभा राहून ह्मणालाः "पौला, धीर धर, कांकी जसी खा यरूशलेमांत मजविषयींच्या गोष्टींची साक्ष दिली तसी रोमांतही तुला द्यावी लागेल." मग दिवस उगवल्यावर आपण पौलाला जिवे मारूं तोपर्यंत खाणार पिणार नाही असा चाळिसांवर यहू- द्यांनी कट करून शपथ घेतली, आणि हे मुख्य याजकाला कळवून ते ह्मणाले: "त्याजविषयीं अणखी कांहीं नीट विचारावे, या निमित्ताने त्याला तुह्माकडे उद्या आणन सभेसमोर उभे करावे असे तुह्मी सरदाराला समजवा, आम्ही तर तो जवळ आल्यापर्वी त्याला वधायाला तयार आहा"