पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १८८] यरूशलेमांत पौलाचे पराधीन होणे. ३. मग तेथून पौल निघून कैसरियास आला. तेथे बरेच दिवस राहत असतां अगब नामें कोणी एक भविष्यवादी यहूदापासून खाली आला. तो पोलाचा कमरबंध घेऊन आपले हातपाय बांधून ह्मणालाः "पवित्र आत्मा असे ह्मणतो, ज्या मनुष्याचा हा कमरबंध आहे त्याला यरू- शलेमांत यहूदी लोक याप्रमाणे बांधून विदेशी लोकांच्या हाती देतील."हें ऐकन तेथल्या सर्व भावांनी यरूशलेमास जाऊं नये असी त्याला विनंती केला. परंतु पौलाने उत्तर दिले. "तुह्मी रडतां व माझें अंत:करण खच- वितां असे कां करतां? कांतर मी बंधांत पडण्यास केवळ नाही, तर प्रभ येशच्या नामासाठी यरूशलेमांत मरायासही तयार आहे." तेव्हां त्यांनी स्वस्थ राहून मटले. "प्रभूच्या इच्छेप्रमाणे होवो!" त्यानंतर तो तेथून निघाला आणि यरूशलेमास आल्यावर याकोबाच्या एथे गेला, आणि सर्व वडील मिळाले. तेव्हां आपल्या सेवेकडून जी कार्ये देवाने विदेशी लोकांमध्ये केलों ती त्याने अनुक्रमाने सांगितली. हे ऐकून त्यांनी प्रभूचे स्तवन केले. प्रक० १८८. यरूशलेमांत पौलाचें पराधीन होणे. (प्रेषि० २१ ---२३.) १. मग दुसऱ्या दिवसी पौल नवस फेडण्याकरितां देवळांत गेला. तेव्हां आश्यांतले यहूद्यांनी त्याला देवळांत पाहून त्याजवर हात टाकून ओरडत बोललेः "अहो इस्राएल लोकानो, धांबा! आमचे लोक व शास्त्र व ही जागा यांस विरुद्ध जो सर्व ठिकाणी सर्वांस उपदेश करितो तो हाच आहे, अणखी याने हेलेणीही देवळांत आणून हे पवित्र स्थान विटा- ळले आहे." आणि सगळे नगर गलबलून लोकांची गर्दी झाली आणि त्यांनी पौलाला धरून देवळांतून ओढून काढले. आणि ते त्याला जिवें मारायाला पाहत आहेत इतक्यांत फौजेच्या रोमी सरदाराला वर्तमान आलें. तेव्हांच तो शिपायी घेऊन त्यांकडे धावून पौलाला बांधण्याची त्याने आज्ञा केली. आणि गलबल्यामुळे कांहीं बरोबर कळेना ह्मणन याला गढीत न्यावे असी त्याने आज्ञा केली. तेव्हां लोकांचा समुदाय पणतीमागे जाऊन याला काढून टाक" असं आरडत होता. आणि पौलाने सरदाराला लोकांसी बोलण्याची परवानगी मिळावी ह्मणून विनंती