पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३५८ पौलाचा उपदेश करण्याकरितां तिसरा प्रवास. [प्रक० १८. व ऐकतां की, केवळ एफसांत नव्हे तर बहुधा सर्व आश्या देशांत या पौलाने जे हातांनी केले ते देव नाहीत, असे बोलून बहुत लोकांस मथावून फितविले आहे. तर हा आमचा उद्योग अपकीर्ति पावेल असें भय आहे हे केवळ नाही, पण मोठ्या अर्तमी देवीचे देऊळ तुच्छ होईल." हैं ऐकून ते रागे भरून ओरडत बोलले: “एफसकरांची अर्तमी थोर!" आणि अवघ्या नगरांत बंडाळी झाली आणि एकचित्ताने लोक अखाड्यांत धांवत गेले. तेव्हां त्यांनी वेगवेगळी अरोळी मारली, कारण मंडळीचा एकच गोंधळ झाला होता, आणि आपण कशाला जमलो आहों है बहुतांस ठाऊक नव्हते. तेव्हां सुमारे दोन तास सर्वांची एकच वाणी झाली की: "एफसकरांची अर्तमी थोर!" २. मग कुळकर्णी याने समुदायाला मोठ्या श्रमाने शांत केला. आणि पौल शिष्यांस बोलावून त्यांचे क्षेमआलिंगन करून मकदन्यांत जायास निघाला. आणि तेथून तो करिंथास जाऊन तेथे तीन महिने राहिला. मग तो समुद्राच्या पलिकडे आश्यांत गेला, कारण पन्नासाव्या दिवसांच्या सणांत आपण यरूशलेमांत असावे असे त्याच्या मनांत होते. मग मिलेतांत पोहंचल्यावर पौलाने एफसाला निरोप पाठवून मंडळीचे वडील बोलावन घेतले. ते त्याजवळ आल्यावर त्याने सांस मटले: “मी आल्याने बांधलेला यरूशलेमाकडे जातो, तेथे मला काय काय होईल हे न कळे, केवळ हे कळले की, बंधने व क्लेश माझी वाट पाहतात असे पवित्र आत्मा मला प्रत्येक नगरांत प्रमाण पटवितो, परंतु मी कशाचीही काळजी करीत नाहीं, मी आपला प्राणही प्रिय मानीत नाही, असे की म्या आपली धांव हर्षाने शेवटास न्यावी. आणि आतां पाहा, माझे तोंड पुढे तुमच्या दृष्टीस पडणार नाही हे मला कळले. यास्तव सावध असा, आणि तीन वर्षे रात्रं- दिवस मी प्रत्येकास आसवांनी बोध करतां राहिलो नाहीं है अठवा. तर आतां अहो भावानो, मी तुह्मास देवाकडे आणि त्याच्या कृपेच्या वचना- कडे निरवितो." हे झटल्यावर त्याने गुडघे टेकून त्या सर्वांबरोबर प्रार्थना केली. सर्वांनी तर मोठा शोक केला आणि पौलाच्या मानेवर पडून त्याचा मुका घेतला. माझे तोंड पुढे तुमच्या दृष्टीस पडणार नाही, असे त्याने बटले होते, यावरून त्यांस विशेष दुःख वादले; मग त्यांनी त्याला तार- वापर्यंत बोळविले.