पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १८७] पोलाचा उपदेश करण्याकरितां तिसरा प्रवास. ३५० ऐकून विश्वासले व बाप्तिस्मा पावले. आणि प्रभूने रात्री पौलाला दृष्टांतांत मटले की: “ भिऊं नको परंतु बोलत जा ब उगा राहूं नको! कां की या नगरांत माझे बहुत लोक आहेत." आणि तो देवाचे वचन सांगत दीड वर्ष राहिला. मग पोल भावांचा निरोप घेऊन तारवांत बसून सुऱ्या देशास गेला. अकुला व प्रिस्किल्ला यांनी एफसपर्यंत त्याला बोळविले आणि तेथे त्यांस सोडून तो फिरून अंत्योखीयोस गेला. त्या वेळेस अपल्लो ना कोणी अलेक्षांद्रियांतील यहूदी मोठा वक्ता व शास्त्रांत निपुण होता तो एफसास आला. तो प्रभूच्या मार्गाविषयी शिकलेला होता आणि प्रभूविषयींच्या गोष्टी नीट सांगून उपदेश करीत असे; परंतु तो केवळ योहानाचा बाप्तिस्मा *) समजत असे. अकुला व प्रिस्किल्ला यांनी तर त्याचे ऐकून त्याला जवळ घेतले आणि देवाचा मार्ग त्याला अधिक स्पष्ट करून दाखविला, नंतर त्याला शिफारसपत्र देऊन करिंथास पाठविले. तेथे पोहचल्यावर जे विश्वासले होते त्यांचे त्याने फार सहाय केले, कां की येशू हाच ख्रीस्त आहे, असे त्याने शास्त्रावरून दाखवून प्रगटपणाने यहूद्यांचे अगदी खंडण केले.

  • ) अपलो याला केवळ योहान्नाच्या वाप्तिम्याविषयी माहिती होती, यावरून त्याने

पन्नासाव्या दिवसांच्या सणाच्या पूर्वी शुभवर्तमान ऐकून विश्वासला असे अनुमान होते. प्रक० १८७. पोलाचा उपदेश करण्याकरितां तिसरा प्रवास. (प्रेषि० १९-२१.) १. सुऱ्या देशांत कांहीं वेळपर्यंत राहून पौल गलती व फुगी यां प्रांतां- तील शिष्यांस स्थिरावितांना एफसांत आला. आणि तो देवाच्या राज्याच्या गोष्टीविषयी वाद' करीत व प्रमाण पटवीत असे. हे तर दोन वर्षे चाललें मगन आश्यांतील सर्व राहणाऱ्यांनी प्रभु येशूचे वचन ऐकिलें. आणि देवाने पोलाच्या हाते असाधारण चमत्कार घडविले. आणि त्या समयीं त्या मार्गाविषयीं बहुत गलबल झाली, कारण कोणी देमेत्रय नामें मोनार अर्तमीचे रुप्याचे देव्हारे करून कारागिरांस बहुत जोड मिळवन ". असे. त्याने त्यांस जमवून झटले “गड्यानो, या उद्योगाने आमची चांगली जीविका होत असती हे तुह्मास ठाऊक आहे आणि तुझी पाहतां