पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३५४ पोलाचा उपदेश करण्याकरिता दुसरा प्रयास. प्रक० १८४ मारून “यांस बंदोबस्ताने राख" असा बंदीशाळेच्या नायकाला हुकूम केला. असा त्याला हुकूम झाल्यावर त्याने आंतल्या बंदीखान्यांत त्यांस घालून त्यांचे पाय खाड्यांत अडकविले. पण मध्यरात्री पोल व सिला यांनी प्रार्थना करून देवाला गाइले. मग एकाएकी एवढा भूमिकंप झाला की बंदीशाळेचे पाये डगमगले, सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांचे बंद सुटले. नायक तर जागे होऊन बंदीशाळेचे दरवाजे उघडलेले पाहून, बंदीवान पळाले असे समजून तो तरवार उपसून आपला घात करणार होता. इतक्यांत पौल मोठ्याने हाक मारून बोललाः "तूं आपणाला काही वाईट करूं नको, कांतर आल्ली सर्व एथेच आहो." मग तो दिवा मागून आंत धांवत गेला, आणि कापून पौल व सिला यांच्यापुढे पडला आणि त्यांस बाहेर काढून ह्मणाला: “महाराज, माझे तारण व्हावे ह्मणून मला काय केले पाहिजे?" ते ह्मणाले : "प्रभ येशू खोस्लावर विश्वास ठेव ह्मणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल." आणि त्यांनी त्याला व त्याच्या घरांतील सर्वांस प्रभूचे वचन सांगितले. आणि त्याने त्यांस घेऊन फटक्यांच्या जखमा धुतल्या, तेव्हांच त्याने व त्याच्या अवघ्या माणसांनी बाप्तिस्मा घेतला. आणि त्याने त्यांस आपल्या घरी नेऊन त्यांपुढे अन्न वाढले, आणि ता सर्व कुटुंबासुद्धा देवावर विश्वास ठेवून हर्षला. मग दिवस उगवल्यावर अधिकान्यांनी पाठवून सांगितले की: "त्या मनुष्यांस सोड!" पण पौल त्यांस ह्मणाला : “आह्मी रोमी मनुष्य असता त्यांनी आमास अपराधी न ठरवितां उघड फटके मारले*) आणि आतां ते आह्मास मुकाट्याने घालवितात काय ? तर असें नको, परंतु त्यांनी जातीने येऊन आमास बाहेर काढ.वे.” तेव्हां अधिकारी हैं ऐकन आले आणि त्यांस बाहेर आणून व त्यांची समजूत करून त्यांनी विनंती केली की: "या नगरांतून तुह्मी जावे."

  • ) रोमी प्रजेतला जो कोणी असेल त्याला फटके मारूंनये, कोणी मारले तर त्यास देहात

शिक्षा असावी, असा रामी लोकांचा कायदा होता. आपणावरील अपराधाचा आरोप टा- ळला जाऊन आपण निर्दोषी भाहो असे सरकाराने लोकांत पत्करावें आणि तसे शुभवन- मानाच्या पापल्या कामाला हरकत होऊ नये झणून पोलाने वरील कायद्याचा उपयोग केला.