पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १८३] यरूशलेमांत प्रेषितांची सभा. ३५१ खीया व इकन्यम यांतील कित्येक यहूदी आले, त्यांनी लोकांस चिथावून पौलाला धोंडमार केला, आणि तो मेला असे समजून त्याला नगराबाहेर ओढून टाकले. पण त्याच्या सभोवते शिष्य उभे राहिले असतां तो उठला वनगरांत गेला. त्यानंतर इकन्यम व पिसिद्यांतील अंयोखीया नगरांत त्यांनी परत येऊन शिष्यांचे मन स्थिरावितांना त्यांस बोध केला की: "विश्वासांत टिकून राहा आणि आपणाला बहुत क्लेशांमधून देवाच्या राज्यांत जावें लागते." आणि त्यांनी त्यांच्यासाठी प्रत्येक मंडळीत वडील नेमून प्रभूकडे त्यांस निरविले. मग तेथून ते (सुन्य प्रांतांतील) अत्योखीयास आले, कारण जे कार्य त्यांनी साधले त्याकरितां ते तेथून निघाले होते. आणि तेथे आल्या- वर आपणांकडून देवाने काय काय केले, आणि विदेशी लोकांस त्याने विश्वासाचेंदार कसे उघडिले हे त्यांनी मंडळीला सांगितले. प्रक० १८3. यरूशलेमांत प्रेषितांची सभा. (प्रेषि० १५.) १. आणि परोशी पंथांतील कित्येक नियमशास्त्राभिमानी यांनी यहृदांतून उतरून अंत्योखीयांतील *) भावांस असा उपदेश केला की: "मोश्याचे नियमशास्त्र संपूर्ण पाळल्यावांचून तुमचे तारण होत नाही." तेव्हां पौल व बार्णबा यांचा त्यांसी मोठा वादविवाद झाल्यावर मंडळीने ठरविले की, पौल व बाबा यांनी व आपणांतून दुसऱ्या कित्येकांनी या विचाराकरितां यरूशलेमांतले प्रेषित व वडील यांजकडे जावे. मग ते यरूशलेमांत आल्यावर प्रेषित व वडील या गोष्टीचा निर्णय करायाला जमले. तेव्हां पेतर उभा राहून त्यांस ह्मणालाः "अहो भावानो, तुह्मास ठाऊक आहे की, पुरातन दिवसांपासून देवाने असी निवड केली की. माझ्या तोंडाने विदेशी लोकांनी सुवार्ता ऐकून विश्वास धरावा (प्रक० १७९क०२). आणि अंतःकरण जाणणा-या देवाने जसा आह्मास तसा यांसही पवित्र आत्मा देऊन त्यांविषयी साक्ष दिली, आणि त्यांचा व आमचा भेद कांहीं ठेवला नाही. तर आतां 9 जूं आमचे पूर्वज व आह्मीही वाहयास समर्थ नव्हतो ते शिष्यांच्या मानेवर घालून तशी देवाची परीक्षा का पाहतां? तथापि प्रभु येशू खीस्ताच्या कृपेने जसे त्यांचे तसे आमचेही तारण होईल असा आमास विश्वास आहे." मग सर्व लोक