पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३५० मागील विषय चालू. प्रक० १२८ तेव्हां यहूदी लोकांनी प्रेषितांचा छळ करून त्यांस आपल्या प्रांतांतून घालविले. ते तर आपल्या पायांची धूळ त्यांजवर झाडून इकन्यमास गेले. प्रक० १८2. मागील विषय चालू. (प्रेषि० १४.) १. मग असे झाले की इकन्यमांत यहूदी सभास्थानांत त्यांनी असा उपदेश केला कीं, यहूदी व विदेशी यांच्या मोठ्या समुदायाने विश्वास धरिला. आणि ते तेथे बहुत दिवस राहिले आणि प्रभूसंबंधी प्रशस्त बोलले. आणि देवाने आपल्या कृपेच्या वचनाला साक्ष देत असतां त्यांच्या हातांनी चमत्कार व अद्भुते घडावी असे केले. नंतर यहदी व विदेशी त्यांचा छळ करूं लागले, तेव्हां ते लुकवनिया देशांतील लुस्त्राव दर्वे व त्यासभोवतील देशांत पळून गेले आणि तेथे शुभवर्तमान सांगू ला- गले. लुस्त्रांत तर कोणी एक माणूस पायांनी अधू असतां जन्मापासून पांगळा होता, त्याने पौलाला बोलतां ऐकिले. पौलाने त्याजकडे दृष्टि लावून त्याला बरा होण्याचा विश्वास आहे असे पाहून मोम्याने मटले की: "तूं आपल्या पायांवर नीट उभा राहा!" तेव्हां तो उडी मारून चालू लागला. आणि पौलाने में केले ते समुदाय पाहून मोठ्याने बोलले: “देव मनुष्यांसारखे होऊन आमाकडे उतरले आहेत. आणि त्यांनी बार्ण- बाला जूस, आणि पौल मुख्य बोलणारा होता ह्मणून त्याला हेर्ने मटले. मग त्यांच्या नगरापुढे जो जूस देव होता, त्याच्या याजकाने बैल व माळा दर- वाज्याजवळ आणल्या आणि लोकांसहित तो यज्ञ करणार होता. । २. हे ऐकून बार्णबा व पौल हे प्रेषित आपली वस्त्रे फाडून लोकां- मध्ये धावून ओरडत बोलले: “अहो मनुष्यानो, असे कां करता ? आमीही तुह्मासारखे सुखदुःख भोगणारे मनुष्य आहो आणि तुमाला सांगतों की या निरर्थक गोष्टी (मूर्तिपूजा) सोडून जिवंत देवाकडे फिरावे : साने आकाश व पृथ्वी व समुद्र व त्यांतील अवघे उत्पन्न केले. त्याने होऊन गेलेल्या पिढ्यांत सर्व लोकांस त्यांच्या त्यांच्या मार्गांनी चालू दिले. तथापि उपकार करीत असतां आकाशापासून पाऊस व बहुफळांचे समय आमास देऊन त्याने आमची अंतःकरणे अन्नाने व आनंदाने तृप्त केली असे करून आपणास साक्षीवांचून राहू दिले नाही." आणि असे बोलून त्यांनी आपणांसाठीं यज्ञ करण्यापासून लोकांस कष्टेंकरून निवारले. मग अंन्यो-