पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक०१८१] पौल प्रेषित याचा उपदेश करण्याकरितां पहिला प्रवास. ३४९ अढळला. तो सर्गय पौल विवेकी मनुष्य तेथील रोमी अधिकारी याच्या जवळ होता. त्याने बार्णबा व शौल यांस बोलावून देवाचे वचन ऐकायास मागितले. पण त्या जादूगिराने त्यांस अडवून अधिकाऱ्याला विश्वासा- पासून फिरवायास प्रयत्न केला. मग शौल जो पौलही झटलेला, तो पवित्र आल्याने पूर्ण होऊन त्याजकडे दृष्टि लावून बोललाः "अरे सर्व कपटाने व सर्व दुष्टाईने भरलेल्या सैतानाच्या मुला, तूं प्रभूचे नीट मार्ग विपरीत केल्यावांचून राहणार नाहींस काय? तर आतां पाहा, प्रभूचा हात तुजवर आहे, आणि तूं अंधळा होसील!" तेव्हां लागलेच अंधार त्याजवर पडला, मग तो कोणी हाती धरून चालवील काय असा शोध करूं लागला. तेव्हां जे झाले ते पाहून अधिकाऱ्याने विश्वास धरिला. ३. तेथून ते पिसिद्यांतील अंत्योखायास (आश्या मैनरामध्ये) गेले आणि शाब्बाथ दिवसीं सभास्थानांत जाऊन बसले. तेव्हां नियमशास्त्र व भविष्यलेख यांचे वाचन झाल्यावर सभेच्या अधिका-यांनी त्यांकडे निरोप पाठविला की: "भावानो, लोकांस बोध करण्याचे वचन तुह्मापासी असले तर बोला.” . तेव्हां पौलाने उभे राहून देवाने' इस्राएल लोकांस इतर राष्ट्रांपासून कसे निवडिले आणि ख्रीस्त जो देहाप्रमाणे दावीदाचा पुत्र याला पाठविले असतां यहूद्यांनी यरूशलेमांत त्याला मारिले, परंतु देवाने त्याला मेलेल्यांतून उठवून पापी लोकांसाठी तारणारा कसा करून ठेविला, याविषयी त्यांस उपदेश केला. मग यहूदी लोक सभास्थानांतून गेल्या- वर विदेश्यांनी विनंती केली की, "आमासही ह्या गोष्टी सांगाव्या." आणि यहूद्यांतील व भक्तिमान मतानुसारी यांतील बहुतेक प्रेषितांच्या मागे गेले. मग पुढल्या शाब्बाथांत बहुतकरून सर्व नगर देवाचे वचन ऐकायास जमले. पण यहूदी लोकांनी क्रोधाक्रांत होऊन त्यांच्या विरुद्ध बोलन निंदा केली. तेव्हां पौल व बार्णबा हे प्रशस्त बोलले की: "देवाचे वचन तुह्मास प्रथम सांगायाचे अगत्य होते, परंतु तुह्मी त्याचा अव्हेर करितां आणि आपणांस सर्वकाळच्या जीवनाला अयोग्य ठरवितां. याव- न पाहा, आह्मी विदेशी लोकांकडे फिरतो." हे ऐकून विदेशी लोक आनं- मत आणि प्रभूचे वचन थोर असे ह्मणाले आणि सर्वकाळच्या जीवनाला नेमलेले होते तितके विश्वासले. प्रभूचे वचन तर सर्व प्रांतांत प्रसिद्ध झाले.