पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४८ पौल प्रेषित याचा उपदेश करण्याकरितां पहिला प्रवास. [प्रक०९८१ त्याने देवाला महिमा दिला नाहीं, ह्मणून प्रभूच्या दूताने लागलेच त्याला मारले आणि किड्यांनी खाऊन तो मरण पावला. देवाचे वचन तर वाढत प्रसारत चालले. प्रक० १८१. पौल प्रेषित याचा उपदेश करण्या- करितां पहिला प्रवास. (प्रेषि० ११ व १३). १. स्तेफनामुळे झालेल्या छळणुकीवरून पांगलेले सुऱ्या प्रांतां- तील अंत्योखीया एथपर्यंत जाऊन यहूद्यांस मात्र देवाचे वचन सांगत असत. त्यांतील कित्येक हेलेणी लोकांसही उपदेश करूं लागले आणि प्रभूचा हात त्यांबरोबर असल्यामुळे पुष्कळ लोक विश्वास धरून प्रभूकडे फिरले. याचे वर्तमान तर यरूशलेमांतल्या मंडळीच्या कानी आले. तेव्हां त्यांनी बार्णवाला अंयोखीयास पाठविले. तो तेथे जाऊन व देवाची कृपा पाहून आनंद पावला आणि अंत:करणांतल्या निर्धाराने त्यांनी प्रभू. कडे राहवे असा त्याने यांस बोध केला *). मग तेथून बार्णबा शौलाचा शोध करायाला तभ्रस गेला, आणि त्याचा शोध लागल्यावर त्याने त्याला अंत्योखीयास आणले. तेथे त्यांनी वर्षभर मंडळींत बहुत लोकांस शिक- विले. आणि शिष्यांस "खिस्ती" हे नांव पहिल्याने अंत्योखीयांत मिळाले।). ___*) यहूदी लोकांमध्ये शुभवर्तमानाचा विस्तार करण्यासाठी यरूशलेम शहर जसें केंद्रस्थान होते. तसें विदेशी लोकांमध्ये तारणाचें घोषण होण्याकरितां अंत्योखीया हे शहर केंद्र झाले. t) खिस्ती लोकांस हे विशेष नाव प्राप्त झाले, तेणेकरून त्यांची स्वतंत्रता दिसण्यांत आली, झणजे यहूदी व ख्रिस्ती धर्मातील लोकांचा भेद दिसं लागला, कारण त्या वेळे- पर्यंत ख्रिस्ती लोक यहूदी लोकांमये मोजले जात होते. २. त्या वेळेस अंत्योखीयांतल्या मंडळींत भविष्यवादी व उपदेशक जे होते, ते प्रभूची सेवा व उपास करीत असतां पवित्र आत्म्याने सांगितले कीः "बार्णवा व शौल यांस ज्या कार्यासाठी म्या निवडिले आहे त्यासाठी त्यांस मजकरितां निराळे करून ठेवा." तेव्हां त्यांनी उपास व प्रार्थना करून व त्यांजवर हात ठेवून त्यांची रवानगी केली. ते कुप्रास बार्णबा याच्या खदेशास तारवांत बसून गेले, आणि सलमी गांवांत जाऊन त्यांनी देवाचे वचन यहूद्यांच्या सभास्थानांत प्रसिद्ध केले. मग ते बेटामधून पाफा नगरापर्यंत गेल्यावर कोणी एक यहूदी जादूगीर बार्येशू नांवाचा त्यांस