पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १८०] हेरोद अग्रिप्पा जो पहिला त्याकडून छळणूक. ३४७ स्याला राखण्यास शिपायांच्या चार चौकड्यांच्या स्वाधीन केले. आणि वल्हांडण सण झाल्यावर त्याला ( वधायाला ) लोकांत बाहेर काढावे असा बेत केला. पण त्याजकरितां देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने होत असे. मग हेरोद त्याला काढणार होता त्याच रात्री पेतर दोन साखळ्यांनी बांधलेला असा दोघां शिपायांच्या मध्ये निजला होता, आणि पाहारेकरी दरवाज्याच्या पुढे बंदीशाळा राखीत होते. तेव्हां पाहा, प्रभचा दूत त्याकडे आला आणि बंदीशाळेत उजेड पडला. मग त्याने पेतराला जागे करून झटले : "लवकर ऊठ." तेव्हां त्याच्या हातांतून सांखळ्या पडल्या, आणि दूताने त्याला सांगितले: “कंबर बांध व जोडा पायांत घालून माझ्या मागे ये!" तेव्हां पेतराने तसे केले, तरी दूताने केले

  • वास्तविक असे त्याला कळले नाही, पण दृष्टांत पाहतों असें त्याला

वाटले. मग पहिला व दुसरा पाहरा ओलांडून लोखंडी दार एथपर्यंत आल्या- वर ते आपोआप त्यांसाठी उघडले, आणि ते बाहेर जाऊन पुढे एका मार्गा- तन गेले, तेव्हांच दूत त्यापासून गेला. मग पेतर शुद्धीवर येऊन यणाला : “आतां मला खरच कळले की, प्रभूने आपला दूत पाठवून मला सोडविले आहे." तसा तो मार्क याची आई मार्या इच्या घरी आला तेथे बहुत लोक एकत्र मिळून प्रार्थना करीत होते. मग पेतर दर- वाज्याच्या दिंडीवर ठोकीत असतां रोदे नामें मुलगी कानवसा घ्यायास आली, आणि पेतराची वाणी ओळखून हर्षामुळे दरवाजा न उघडतां आंत धांवत जाऊन पेतर दरवाजापुढे उभा राहिला आहे, असे तिने सांगितले. पण त्यांनी तिला मटले: "चळलीस." तिने तर हडसून तसेच सांगितले. मग ते ह्मणाले : “त्याचा दूत असेल.” पेतर ठोकीत ठोकीत असतां ते दरवाजा उघडून त्याला पाहून थक्क झाले. तेव्हां आपणाला प्रभूने बंदीशाळेतून कसे काढले है त्याने त्यांस सांगितले. मग तो निघून दुसन्या ठिकाणी गेला. मग हेरोदाने सकाळी त्याचा शोध केला असतां शोध लागला नाहीं, ह्मणून त्याने पाहरेकऱ्यांची चौकसी करून त्यांस ठार मारावे असी आज्ञा दिली. २ नंतर हेरोद कैसरियांत जाऊन राहिला. तेव्हां एका दिवसी जवस्त्रे लेवून व आसनावर बसून लोकांसी भाषण केले. लोकांनी तर की देवाची वाणी आहे, मनुष्याची नव्हे" असी अरोळी केली त्या समयीं