पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२ कदागोमर आणि मलखीसदेक. [प्रक० ९ आणि तूं उजवीकडे तर मी डावीकडे जाईन." तेव्हां लोटाने आपणासाठी यार्देनेचे अवघे मैदान निवडून घेतले ; कारण परमेश्वराने सदोम व गमोरा यांचा नाश केल्यापूर्वी परमेश्वराच्या बागासारखें संपूर्ण ओलसर होतें. लोटाने तर आपला डेरा सदोमाकडे दिला, पण सदोमांतील माणसे दुष्ट व परमेश्वरासमोर अतिपापिष्ठ होती. आणि अब्रामापासून लोट वेगळा झाल्यावर परमेश्वर त्याला बोलला की: "आपली दृष्टि वर करून पाहा, कां तर जो देश तुला दिसतो तो सर्व मी तुला व तुझ्या संतानाला सर्वकाल देईन." मग अब्राम डेरा घेऊन हेब्रोनांत एलोनमने एथें येऊन राहिला, आणि तेथे त्याने परमेश्वराला वेदी बांधली. प्रक० ९. कदागोमर आणि मलखीसदेक. (उत्प० १४). १. आणि असे झाले की एलाम (इराण) याचा राजा कदागोमर याने सदोमाचा राजा व गमोन्याचा राजा यांसी लढाई केली. कारण की बारा वर्षे यांनी कदागोमराची सेवा केली आणि तेराव्या वर्षी ते फितले, यास्तव कदागोमराने येऊन त्यांस मारिले आणि त्यांचे अवघे धन लुटून बहुत लोकांबरोबर लोट, जो अब्रामाचा पुतण्या, यासही घेऊन गेला. ही गोष्ट ऐकून अब्रामाने आपली ३१८ शिकलेली माणसे घेऊन, आणि अकोल व अनेर व मने, जे आमोरी एलोनांत आपले करारी होते, त्यांसही बोलावून कदागोमर राजाच्या पाठीस लागून रात्री त्यावर छापा घालून त्यास मारिले, आणि त्याने अवघे धन व आपला भाऊ लोट याला व त्याचे धन माघारें आणले *).

  • ) लोट अवामाचा पुतण्या होता, झणून अवामाने त्याचा कैवार घेतला असे

केवळ नाही, तर भवघा देश त्याला वचनरूपी दिला होता, यास्तव त्याने या वेळेस लढाईस जावे हे त्याला योग्यच होते. २. मग परत आल्यावर त्याला भेटायास शालेम (यख्शालेम) याचा राजा मलखीसदेक भाकरी व द्राक्षरस घेऊन बाहेर आला. हा तर परा- त्पर देवाचा याजक होता, आणि हा अब्रामाला आशीर्वाद देतां ह्मणाला: परात्पर देव आकाशाचा व पृथ्वीचा धनी याकडून अब्राम आशीवोदित हावा. आणि परात्पर देवाने तझ्या हातांत शत्रु दिले, त्याची स्तुति असा."