पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१ प्रक०८] अब्रामास बोलावणे. या नद्यांच्या खोल पात्रांकडून भिन्न भिन्न झाला आहे, पण जिकडे तिकडे गरेंचरण्याची उत्तम कुरणे आहेत. पूर्व प्रदेशांतील डोंगरवटीच्या उत्तरेकडे जे पठार आहे त्याचे नांव बाशान, आणि दक्षिण प्रांतास गिलाद असे मटले आहे. प्रक० ८. अब्रामास बोलावणे आणि त्याचे देशांत- रास जाणे. (उत्प० १२ व १३). १. शेमापासून नवव्या पिढीतला जो तेरह, तो आपले पुत्र अब्राम, नाहोर व हारान यांबरोबर खासदी देशांतील ऊर गांवांत राहत होता. हारान हा तेथेच मरण पावला. पण तेरहाने आपली कुटुंबांतील माणसे बरोबर घेऊन आपला देश सोडला, आणि ती हारान (मसपटम्यांतील हारान) एथे येऊन राहिली. आणि तेरह याने अन्य देवांची सेवा केली (यहो० २४.२). आणि परमेश्वराने अब्रामाला सांगितले होते की: "तूं आपला देश व आपले कूळ व आपल्या बापाचे घर यांतून निघून जो देश मी तुला दाखवीन त्यांत जा, मग मी तुला मोठी प्रजा करीन. आणि तुला आशीर्वाद देईन, आणि तुझे नाम मोठे करीन, आणि तुजकडून पथ्वीतील सर्व वंश आशीर्वाद पावतील." तेव्हां अब्राम ७५ वर्षांचा असतां आपली बायको सारय घेऊन गेला. पण सारय वांझ होती, तिला लेकरूं नव्हते. त्याचा भाऊ हारान याचा पुत्र लोट', हाही बरोबर गेला. मग ती शखेम नगरापासी जे एलोनमोरे आहे, तेथवर पोचली. आणि परमेश्वर अब्रामाला दर्शन देऊन बोलला की: "हा देश मी तुझ्या संतानाला देईन." मग अब्रामाने तेथे परमेश्वराला वेदी बांधली, आणि परमेश्वराचे नाम घेऊन प्रार्थना केली. २. आणि लोटालाही मैढरे व गुरे बहुत होती आणि त्यांनी एकत्र राहावे असे देश साहीना. अब्रामाचे गुराखी व लोटाचे गुराखी यांचे भांडण झाले. तेव्हां अब्राम लोटास ह्मणाला: "मजमध्ये व तुजमध्ये वाद नसावाच, कांतर आपण भाऊबंद आहो; अवघा देश तुजपुढे नाही काय? तर मजपासून वेगळा हो, तूं डावीकडे गेलास, तर मी उजवीकडे जाईन.