पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४६ हेरोद अग्रिप्पा जो पहिला त्याकडून छळणूक. [प्रक० १८० पेतर ह्मणाला : “यांस आह्मासारखा पवित्र आत्मा मिळाला, त्यांचा बाप्ति- स्मा करण्याकरितां पाणी कोणाच्याने मना करवेल? 1) आणि प्रभूच्या नामाने त्यांचा बाप्तिस्मा करावा, असी त्यान आज्ञा केली.

  • ) "तो त्याला मान्य आहे," झणजे कोणी प्रथम विदेशी असो किंवा यहूदी असो तो

खीरताच्या राज्यांत येण्यास योग्य आहे. विदेशी लोकही खीरताच्या राज्यांत येण्यास बो- लाविलेले आहेत, याविषयी भविष्यवाद्यांनी वारंवार इतकें स्पष्ट भविष्य सांगितले आहे की, कोणालाही या गोष्टीविषयी संशय राहं नये; परंतु जे विदेशी असत्धर्मी आहेत त्यांस अगोदर यहूदी होऊन संपूर्ण नियमशास्त्र पाळिले पाहिजे की काय, याविषयी संशय होता. या शेवटल्या मतास प्रेषितही अनुसरले होते. यास्तव या भ्रांतीपासून त्यांस सोडविण्याकरिता यहूद्यात मुख्य जो प्रेषित त्याला विशेष ईश्वरी प्रगटविणे व्हावें याचे अगत्य होते. 1) पवित्र आत्म्याचें जें दान ते या प्रसंगी बाप्तिस्मा होण्याच्या अगोदर प्राप्त झाले, तेणें- करून वाप्तिस्म्याची गरज नाही असें तर काही झाले नाही. कारण त्या प्रसंगी लोकांस पवित्र आत्मा मिळाला झणूनच पेतराला त्यांचा वाप्तिस्मा व्हावा हे योग्य आहे असे वाटले, आणि वाप्तिस्म्याच्या योगाने ते रखीस्ताकडे होऊन देवाची लेकरें व सर्वकाळच्या जीवनाचे वारीस असे झाले.- बाप्तिस्मा हा विधि खीस्ताने आपल्या मंडळीला दिला आणि तो करायाचा (माथी २८, १९, मार्क १६, १५. १६). परंतु आपला आत्मा देण्या- विषयों देव स्वतंत्र आहे म्हणून वाप्तिस्मा होण्यापूर्वीही तो जसा त्या वेळेस कनेत्याला तसा आताही नियमाबाहेरून कोणी योग्य पात्राला देऊ शकतो. ____४. विदेशी लोकांनीही देवाचे वचन स्वीकारले असै वर्तमान प्रेषितांनी व भावांनी ऐकिले. मग पेतर यरूशलेमास आल्यावर यहूद्यांतील भाऊ त्यांसी वाद करीत बोलले की "बेसुनत माणसांमध्ये जाऊन त्यांच्यासंगतीं तूं खालेस. "तेव्हां पेतराने अनुक्रमाने उलगडा करीत त्यांस सर्व सांगितले. मग हे ऐकून ते उगेच राहिले, आणि देवाचे स्तवन करीत बोलले की: "तर देवाने विदेशी लोकांसही जीवनासाठी पश्चात्ताप दिला आहे." प्रक० १८०. हेरोद अग्रिप्पा जो पहिला त्याकडून छळणूक. (प्रेषि० १२.) १. त्यावेळेस हेरोद राजाने मंडळीतल्या कित्येकांस दुःख द्यावे ह्मणून हात घातला. योहान्नाचा भाऊ याकोब याला तर त्याने तरवारीने मारले, आणि यहूदी लोकांच्या मनास उतरले असे पाहून त्याने पेतरालाही धरिलें, परंतु बेखमीर भाकरीचे दिवस असल्यामुळे त्याने त्याला बंदीशाळेत ठेवून