पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १७९] ऐन्या, टबीथा, कर्नेल्य, ३४३ याच्या घरी शौल नांवे तसुकर याचा शोध कर, कांकी पाहा, तो प्रार्थना करीत आहे, आणि त्याने दृष्टांत पाहिला आहे की, कोणी अनान्या नांवाच्या माणसाने आंत येऊन डोळे नीट होण्यासाठी आपणावर हात ठेवला." अनान्याने उत्तर दिले: “हे प्रभू, यरूशलेमांतल्या तुझ्या पवित्र लोकांस त्या मा- णसाने किती उपद्रव केलाअसे म्या त्याजविषयीं ऐकिलें आहे, आणि एथेही तझनाम घेणाऱ्या सर्वांस बांधावे, असा मुख्य याजकापासून त्याला अधिकार मिळाला आहे." पण प्रभूने त्याला म्हटले: “जा, कांकी विदेशी लोक व राजे व इस्राएल लोक यांच्या समोर माझे नाम सांगण्याकरितां तो माझें निवडलेले पात्र आहे; आणि त्याला माझ्या नामासाठी किती दुःख सोसावे कागेल हे मी त्याला दाखवीन." मग अनान्या जाऊन त्याजवर हात ठेवि- तो तो लागलेच त्याच्या डोळ्यावरून खपल्यांसारखे काहीसे पडले, आणि नाच त्याला दृष्टि आली; आणि त्याने उठून बाप्तिस्मा घेतला. मग अन्न खाल्यावर त्याला शक्ति आली आणि त्याने लागलेच सभास्थानांत रखीस्ताविषयीं गाजविलें कीं, तो देवाचा पुत्र आहे, आणि शौलाला सामर्थ्य उत्तरोत्तर आले, आणि त्याने हाच खीत आहे असे स्थापून जे यहूदी लोक दमसेकांत राहत होते, त्यांस कुंठित केले. तेव्हां यहूदी लोकांनी त्याला जिवे मारण्याचा विचार मांडून रात्रंदिवस दरवाजे राखीत होते. पण त्यांचा कट शौलाला माहीत झाला. शिष्यांनी तर त्याला रात्रीस घे- ऊन पाटीत बसवून कोटावरून खाली सोडले. मग शौल यरूशलेमांत येऊन शिष्यांसी मिळायाला झटला, परंतु शिष्य त्याला भीत होते. पण बाबा (प्रक० १७३) याने त्याला घेऊन प्रेषितांकडे आणले. तेव्हां तो त्यांबरोबर यरूशलेमांत असून प्रभु येशूच्या नामाने प्रशस्त बोलत असे. आणि एथेही यहूदी लोक त्याचा छळ करीत असतां भावांनी त्याला कैस- न्यांत नेऊन तस पाठविले. प्रक० १७९. ऐन्या, टबीथा, कल्य. (प्रेषि० ९-११.) १. यावर सर्व यहूदी व गालील व शोमरोन,या देशांतील मंडळ्यांस शांति झाली. आणि त्या वृद्धि पावून पवित्र आत्म्याच्या शांतवनाने चालून वाढत गेल्या. मग पेतर सर्व प्रांतांत फिरत असतां लुदा नामें गांवांत जे पवित्र राहत होते त्यांकडे गेला. तेथे त्याला ऐन्या नांवाचा कोणी माणूस अढळला, तो