पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४१ प्रक० १७७] हवशी प्रधान, मजवर येऊ नये हाणून तुह्मीच माझ्यासाठी प्रार्थना करा." यावर प्रेषितांनी यरूशलेमाकडे जातां जातां शोभरोनी लोकांच्या बहुत गावांत सुवाती सांगितली.

  • ) या पाठलागाकडूनही शुभवर्तमानाचा अधिक प्रसार मात्र झाला.

प्रक० १७७. हबशी प्रधान. (प्रेषि०८.) आणि प्रभूच्या दूताने फिलीपाला असे झटले की: "जी यरूशलेमा- पासून गाजाकडे जाती त्या वाटेने जा." तेव्हां तो उठून गेला, आणि पाहा, कोणी हबशी मनुष्य राणी कंदाके इचा प्रधान तो यरूशलेमांत भजन करायासाठी आला होता, तो परतून जातांना आपल्या रथांत बसन यशाया भविष्यवाद्याचा ग्रंथ वाचीत होता. तेव्हां फिलीपाला आत्म्याने सांगितले : " जाऊन त्या रथासी मीळ." फिलीप तर धांवत जाऊन त्याला यशायाचा भविष्यवाद वांचतांना ऐकून ह्मणाला : "तूं वाचतोस ते तर तुला समजते काय?" त्याने झटले :" कोणी मला दाख- विल्यावांचून मला कसे समजेल?" आणि असे बोलून त्याने आपल्या बरोबर बसायाला फिलीपाला बोलाविले. शास्त्रांतील हा लेख तर तो वाचीत होता की, (यशा०५३) "याला मेंढरासारखे वधासाठी नेले आणि जसे कोंकरूं आपल्या कातरणाऱ्यापुढे मुके असते, तसे त्याने आपले तोंड उघडिलें नाहीं" इत्यादि (प्रक० ८१ क० १). प्रधानाने तर मटले. "मी तुला विनंती करतो की, भविष्यवादी कोणाविषयीं असे हाणतो, आपल्याविषयी किंवा दुसऱ्या कोणाविषयीं ?" मग फिलीपाने त्याच लेखापासून प्रारंभ करून येशूची सुवार्ता त्याला सांगितली. मग वाटेने जातां जातां ते काही पाण्याकडे आले. तेव्हां प्रधान ह्मणालाः "पाहा, पाणी आहे, मला बाप्तिस्मा घेण्यास काय अडचण आहे?" फिलीपाने मटले: “जर तूं आपल्या सर्व अंतःकरणाने विश्वास धरतोस तर योग्य आहे." त्याने उत्तर दिले कीः “येशू खीस्त देवाचा पुत्र आहे, असा मी विश्वासतो." तेव्हां त्याने त्याला बाप्तिस्मा दिला. आणि ते पाण्यां. तन' वर आले, तेव्हां प्रभूच्या आत्म्याने फिलीपाला काढून नेले, आणि केसरियापर्यंत जे गांव लागले त्यांत फिरतां त्याने सुवार्त्ता गाजविली. तो प्रधान तर आपल्या वाटेने हर्ष करीत चालला.