पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४० जादुीर शिमोन. [प्रक० १७६ प्रभू, हे पाप त्यांजकडे मोजू नको!" असे बोलून तो निजला, शौल तर त्याच्या वधाविषयीं मान्य होता. _*) साक्षी यांनी देहात दंडाच्या अपराध्यावर पहिल्याने घाउ टाकावे असी भाज्ञा होनी. अनु० १७, ६. इत्यादि. प्रक०१७६. जादुगीर शिमोन, (प्रेषि०८.) त्या वेळेस यरूशलेमांतल्या मंडळीचा मोठा छळ झाला, आणि प्रेषित खेरीज करून ते सर्व यहूदा व शोमरोन देशांत पांगून गेले. आणि शौल तर घरोघरी शिरून पुरुषांस व बायकांसही धरून ओढून बंदीशाळेत घालून मंडळीचा मोड करीत होता. तेव्हां जे पांगून गेले ते देवाची सुवाती सांगत चहुंकडे फिरले *). आणि फिलीप (त्या सात कारमान्यांतील एक) याने शोमरोन शहरांत जाऊन त्यांस खीस्ताविषयी उपदेश केला.आणि जे चमत्कार फिलीप करीत होता ते पाहून समुदायांनी त्याच्या सांगित- लेल्या गोष्टींकडे एकमत होऊन लक्ष दिले आणि त्या नगरांत फार आनंद झाला. त्या नगरांत तर शिमोन नांवाचा कोणी पुरुष होता, तो जादुगिरी करून मी कोणी मोठा आहे असे दाखवीत असे. त्याजकडे सर्व अबालवृद्ध लक्ष देऊन बोलत असत की: "हा देवाची मोठी शक्ति आहे." फिलीपाच्या उपदेशावर लोकांनी विश्वास धरिला, तेव्हां पुरुष व बायकाही त्यांचा बाप्तिस्मा झाला. मग शिमोनही स्वतां विश्वास धरून व बाप्तिस्मा घेऊन फिलीपाच्या संगतीं राहिला. नंतर शोमरोनाने देवाचे वचन अंगिकारले आहे, हे यरूशलेमांतील प्रेषितांनी ऐकून यांजकडे पेतर व योहान यांस पाठविले. त्यांनी तेथे जाऊन त्यांस पवित्र आत्मा मिळावा ह्मणून त्या लोकांविषयी प्रार्थना केली. तेव्हां प्रेषितांनी त्यांजवर हात ठेविले आणि त्यांस पवित्र आत्मा मिळाला. शिमोनाने हे पाहून त्यांस द्रव्य दाखवून झटले: “ज्या कोणावर मी हात ठेवीन' त्याला पवित्र आत्मा मिळावा, ह्मणून शक्ति मलाही द्या?" पण पेतर त्याला ह्मणालाः "तुझे रुपे तुझ्याबरोबर नाश पावो! कारण देवाची देणगी पैक्याने विकत घ्यायाला खा कल्पिले, या गोष्टीचा तुला भाग किंवा वांटा नाही, कांकी देवाच्या समार तुझे अंतःकरण नीट नाही. तर तूं या आपल्या दुष्टतेचा पश्चा- ताप कर.' शिमोनाने उत्तर दिले. "तुझी सांगितले त्यांतले काहीं