पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३८ गमलिएल याची मसलत. प्रक० १७४ चांगल्या बंदोबस्ताने बंद केलेली आणि बाहेर दरवाज्यांपुढे पाहारेकरी उभे राहिलेले असे आह्मी पाहिले खरे, परंतु उघडल्यावर आमास आंत कोणी सांपडला नाही." हे ऐकून याचा काय परिणाम होईल याविषयी त्यांस संशय आला. इतक्यांत कोणी येऊन त्यांस सांगितले: “पाहा, ज्या मनुष्यांस तुह्मीं बंदीशाळेत घातले ते देवळांत उभे राहून लोकांस उपदेश करीत आहेत." तेव्हां सरदाराने जाऊन त्यांस बलात्कार केल्या- वांचून आणिले, कारण लोक आमास धोंडमार करतील, असे त्यांस भय वाटले. त्यांनी तर त्यांस आणून सभेमध्ये उभे केले, तेव्हां मुख्य याजकाने त्यांस विचारले की: "या नामाने उपदेश करूं नका, असे आह्मी तुह्मास निक्षून सांगितले की नाही?" पेतराने उत्तर दिले की: "माणसांपेक्षा देवाला मानले पाहिजे. ज्या येशूला तुझी झाडावर टांगून मारले त्याला आमच्या पूर्वजांच्या देवाने उठविले, त्याने इस्लाएलाला पश्चात्ताप व पापाची क्षमा द्यावी म्हणून देवाने आपल्या उजवीकडे त्याला उंच करून राजा व तारणारा केले आहे; आणि या गोष्टीविषयी आह्मी त्याचे साक्षी आहो." २. हे ऐकून ते खोचले आणि त्यांस जिव मारायाचा विचार करूं लागले. मग सर्व लोकांतला प्रतिष्ठित न्यायशास्त्री असा कोणी गमलि- एल नामें परोशी सभेत उभे राहून याने प्रेषितांस जरासे बाहेर करा- याला सांगितले आणि त्यांस म्हटले : "इस्राएल मनुष्यानो, तुम्ही या माणसांस काय करणार याविषयी आपणांस संभाळा. कांकी में मत व हे कार्य मनुष्यांचे असल्यास व्यर्थ होईल, पण देवाचे असले तर तुमच्याने ते व्यर्थ करवत नाही, कदाचित् तुह्मी देवासी भांडणारेही व्हाल." ते तर त्याला मान्य होऊन त्यांनी प्रेषितांस बोलावून फटके मारले अ.णि "येशूच्या नामाने बोलू नका" असी ताकीद करून त्यांस सोडले. ते तर आपण येशूच्या नामासाठी धिक्कार पावण्यास योग्य ठरलों यामुळे आनंद करून सभेच्या समोरून निघाले आणि येशू खीस्ताचा उपदेश करणे त्यांनी सोडले नाही.