पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १७४] गमलिएल याची मसलत. ३३७ पायांसी ठेवले. पण अनान्या नांवाचा कोणी माणूस व त्याची बायको साफैरा यांनी माल विकला. आणि त्याच्या बायकोला ठाऊक असतां याने मोलांतून कांही ठेवून घेतले, आणि बाकी आणून प्रेषितांच्या पायांसी ठेवले. पण पेतर बोललाः "अनान्या, खा पवित्र आत्म्यासीं लबाडी करावी आणि शेताच्या मोलांतून कांहीं ठेवून घ्यावे, ह्मणून सैतानाने तुझें अंतःकरण कां भरविले आहे! ते होते तोवर तुझ्या खासगीचे नव्हते! आणि विकल्यावर मोल तुझ्या हातीं नव्हते काय? हे कर्म वा आपल्या मनांत कां आणले ? माणसासी नाही, तर देवासी खा लबाडी केली!" हे शब्द ऐकून अनान्याने पडून प्राण सोडला;आणि हे ऐकणान्या सर्वांस मोठे भय प्राप्त झाले. मग तरण्यांनी उठून त्याला बाहेर नेऊन पुरिलें.- मग सुमारे प्रहराच्या अंतराने त्याची बायको जे झाले ते न समजून आंत आली. पेतर तिला बोलला : “अगे मला सांग, एवढ्याला तुह्मी शेत विकले काय? ती म्हणाली: "होय एवढ्याला." पण पेतर तिला ह्मणालाः "प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहवी ह्मणून तुह्मी एकोपा का केला? पाहा ज्यांनी तुझ्या नव-याला पुरिले त्यांचे पाय दारासी आहेत, ते तुलाही उच- लन नेतील. लागलेच ती त्याच्या पायांजवळ पडून प्राण सोडला. मग तरणे आंत आले आणि त्यांनी तिला बाहेर नेऊन तिच्या नवऱ्या- जवळ पुरिलें. आणि सर्व मंडळीला मोठे भय प्राप्त झाले. प्रक० १७४. गमालेएल याची मसलत. (प्रेषि० ५.) १. प्रेषितांच्या हातांनी तर लोकांमध्ये बहुत चमत्कार व अद्भुत घडली; आणि लोकांनी त्यांस थोर मानले आणि उत्तरोत्तर पुष्कळ विश्वास धरून प्रभूकडे झाले. मग मुख्य याजक व त्याचे अवघे संगतीचे सदोकपंथी, ते उठन कोपास चढले आणि प्रेषितांस साधारण बंदीशाळेत घातले. पण रात्री प्रभूच्या दूताने बंदीशाळेचे दरवाजे उघडले आणि त्यांस बाहेर आणून मटलेः “जा, आणि देवळांत उभे राहून या जीवना- च्या सर्व गोष्टी लोकांस सांगा." तेव्हां ते पहाटेस देवळांत जाऊन उपदेश करूं लागले. मुख्य याजकाने तर न्यायसभा एकत्र बोलाविली आणि प्रेषितांस आणायास बंदीशाळेकडे पाठविले. मग कामदार जाऊन ते नाहीत असे पाहून त्यांनी परत येऊन सांगितले की, "बंदीशाळा- 43 H