पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३६ अनान्या आणि त्याची बायको साफैरा. प्रक० १७३ आमचे तारण झाले पाहिजे असे दुसरे नाम आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही." मग पेतराची व योहान्नाची प्रशस्तता पाहून आणि हे निरक्षर आहेत असे समजून त्यांनी आश्चर्य केले. आणि बरा झालेला मनुष्य त्यांच्या बरोबर उभा राहून त्यांच्याने कांहीं विरुद्ध बोलवेना. मग येशूच्या नामाने अगदी उपदेश करूं नका असी यांनी त्यांस आज्ञा केली. पण पेतर व योहान्न यांनी त्यांस उत्तर दिले की :" देवापेक्षा तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीस योग्य की अयोग्य याचा तुह्मी विचार करा ! कां की ज्या गोष्टी आह्मी पाहिल्या व ऐकल्या त्या बोलं नयेत हे आमच्याने होत नाहीं." मग त्यांनी त्यांस अणखी भय घालन सोडून दिले. ते तर सुटल्यावर आपल्या लोकांकडे गेले आणि जे घडले होते ते ऐकून ते एकचित्ताने देवाला मोठ्याने ह्मणाले: “हे स्वामी, आ- काश व पृथ्वी यांचा उत्पन्नकर्ता देव तूंच आहेस. वास्तविक ज्याला ला अभिषेकिले त्या तुझा पवित्र पुत्र येशू यावर विदेशी लोक व इस्राएल लोक यांसहित हेरोद व पंतय पिलातही एकत्र झाले, असे की जे कांहीं घडावे ह्मणून तुझ्या हाताने व तुझ्या संकल्पाने पूर्वी नेमले ते त्यांनी करावे, तर आतां हे प्रभू, तूं त्यांच्या भेडावण्या पाहा, आणि आपल्या दासांनी पूर्ण प्रशस्ततेने तुझें वचन बोलावे असें कर.” आणि त्यांनी प्रार्थना केल्यावर जेथे ते मिळाले होते, ती जागा डळमळली, आणि ते अवघे पवित्र आल्याने पूर्ण होऊन देवाचे वचन प्रशस्त बोलू लागले. प्रक०१७३. अनान्या आणि त्याची बायको साफैरा. (प्रेषि० ४ व ५.) विश्वासणाऱ्यांचा समुदाय तर एका हृदयाचा व एका जिवाचा होता,आणि कोणीही आपल्या मालमत्तेतील कांहीं आपले असे ह्मणत नव्हता. तर त्यांस सर्व पदार्थ समाईक होते. आणि प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभ येशूच्या पुन्हा उठण्याविषयी साक्ष देते झाले. आणि शेतांचे किंवा घरांचे जितके मालक होते तितके ती विकून विकलेल्यांचे मोल आणून प्रेषि- तांच्या पायांसी ठेवीत, मग जसजसी कोणाला गरज लागे, तसे प्रयेकाला वांटून देत. लेवी तर जो जन्माने कुप्रसी, ज्याला प्रेषितांनी बार्णबा असे नांव दिले, त्याला शेत होते ते त्याने विकून त्याचे मोल आणून प्रेषितांच्या