पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रक० १७२] पांगळ्या माणसाला बरे करणे. ३३५ मग पेतर त्याला ह्मणालाः "रुपे व सोने मजजवळ नाहीं, जे मजपासी आहे ते तुला देतो; नाजोरी येशू ख्रीस्त याच्या नामाने उठून चाल." असे बोलून त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठविले, आणि तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला, आणि देवाची स्तुति करीत तो यांच्या बरोबर देवळांत गेला. आणि सर्व लोकांनी त्याला पाहून त्याव- न आश्चर्याने व विस्मयाने व्याप्त झाले. हे पाहून पेतराने लोकांस घटले: “अहो इस्राएल मनुष्यानो, आह्मी आपल्या सामर्थ्याने किंवा सुभ- तीने याला चालविले, असे समजून आमाकडे कां निरखून पाहतां? आमच्या पूर्वजांचा देव याने आपल्या येशू पुत्राला गौरविले आहे, त्याला नमी पराधीन करून पिलातासमक्ष, तो सोडायास निश्चय करीत असतां याला नाकारले. तुह्मी तर जो पवित्र व न्यायी त्याला नाकारले, आणि बामासाठी घातकी माणसाला सोडा, असे मागितले; पण जीवनाच्या अधिकाऱ्याला तुह्मी जिवे मारले, त्यालादेवाने मेलेल्यांतून उठविलें याविषयीं आह्मी साक्षी आहो. आणि त्यावरल्या विश्वासाने या माणसाला तुह्मा सर्वांच्या समक्ष ही शरीरसंपत्ति मिळाली. तर आतां भावानो, तुह्मी अज्ञानपणाने आणि तसेच तुमच्या अधिका-यांनीही ते केले, हे मला ठाऊक आहे, यास्तव तुमची पापे पुसून टाकली जावी ह्मणून पश्चात्ताप करा व फिरा." ते तर लोकांसीं बोलत असतां याजक व देवळाचा सरदार व सदोकी (ज्यांस येशूकडून मेलेल्यांचे पुन्हा उठणे होईल हा उपदेश वाईट पाटला) ते त्यांजवर चालून आले आणि त्यांनी त्यांस कैदेत ठेवले. तरी वचन ऐकणान्यांतील बहुत विश्वासले, आणि पुरुषांची संख्या सुमारे ५००० झाली. २. मग दुसऱ्या दिवसी सकाळी त्यांचे अधिकारी व वडील मिळाले आणि त्यांनी प्रेषितांस मध्ये उभे करून पुसले की “हे तुह्मी कोणत्या सामर्थ्याने किंवा कोणत्या नामाने केले?" तेव्हां पेतर पवित्र आम्याने पूर्ण होऊन त्यांस ह्मणालाः "अहो लोकांच्या अधिकाऱ्यानो व इस्राएलाच्या वडिलानो, तुह्मा सर्वांस व सर्व इस्राएल लोकांस हे ठाऊक असो की, नाजोरी येशू खीस्त ज्याला तुझी खांबावर मारले, ज्याला देवाने मेलेल्यां- तून उठविले, त्याच्या नामाने हा माणूस तुमच्यापुढे बरा होऊन उभा राहिला आहे. आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाहीं, कां की जेणेकरून