पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पालेस्टैन देश. [प्रक० ७ २. यार्देन नदी पालेस्टैन देशाच्या मध्य भागांतून दक्षिण वाहिनी जात असल्यामुळे त्या देशाचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग झाले आहेत. यार्देन नदी लबानोन डोंगरांतून निघून मेरोम सरोवरांतून जाती, आणि पुढे गेनेसारेथ सरोवर, ज्याला गालील समुद्र अथवा तिबे- रयाचे सरोवर ह्मणतात, त्यांतून साहा सात कोश लांब जाऊन शेवटी दक्षिणेस मतसमुद्रास मिळती, मग तेथून तिचा पुढे ओघ नाही. गालील समुद्रांत बहुत जीव आहेत, आणि त्याच्या आसपासचा प्रदेश सुंदर व सुपीक आहे. जेथे सर्वत्र स्वस्थता आहे असल्या ठिकाणाला गालील समु- द्राची उपमा आहे. आणि मतसमुद्र केवळ शापाची व मुत्यूची उपमा आहे. कारण त्यांतील खारट पाण्यात किंवा त्याच्या आसपासच्या जाग्यांत जीव वांचत नाहीत. त्याच्या सभोवती मोठाले कडे असून मध्ये पाणी कोंडलेले असते, आणि त्यांतील हवा अतिशय उष्ण असून जे पाणी यार्दैन नदीतून त्यांत मिळते ते वाफ होऊन जाते. पालेस्टैनच्या पूर्व भागांत अनेक ल- हान लहान नद्या आहेत, त्यांपैकी यार्मुक आणि याब्बोक ह्या यार्देन नदी- ला मिळतात आणि अर्नोन व सारेथ ह्या मृतसमुद्रांत जाऊन पडतात. पश्चिम भागांतून केवळ नाले व ओहळ वाहतात. ३. लबानोनपासून दोन डोंगरांच्या रांगा निघून यार्देनेच्या पश्चिमेस एक व पूर्वेस एक अशा उत्तरेकडून दक्षिणेस जातात. पश्चिम भागांत जो डोंगरी प्रदेश आहे. त्यांत बहुत प्रकारची जमीन आहे, आणि तो प्रदेश बहुत दरे व नाले व ओहोळ यांकडून व्यापला आहे. भूमध्य- समुद्राच्या किनाऱ्यापासून देश चढत चढत २०००-३००० फुटीपर्यंत उंच होत जातो, मग यार्देन नदीकडे एकाएकी उतरतो. समुद्रापासन यार्देन नदीपर्यंत जे ईन्जेल नामक मोठे मैदान आहे, ते पश्चिमेकडील डोंगरी प्रदेश विभागून त्याचे दोन भाग करिते. उत्तरेस जो प्रांत तो गालील डोंगरी प्रांत आहे, आणि दक्षिणेकडील एफ्राइम पर्वत (शमरोन) व यहूदाचा डोंगरी प्रांत (यहूदा) असे आहेत..-ईजेल मैदानांतन किशोन' नामक नदी वाहती, आणि ती कर्मेल डोंगराच्या पायथ्यासी समुद्रास मिळती.-कर्मेलाच्या उत्तरेस समुद्रकाठाने आके नामक मैदा- न आहे, आणि त्याच्या दक्षिणेस सारोन आणि सफेला ह्या नावांची दोन मैदाने आहेत.-पूर्व डोंगरी प्रदेश हा यार्मुक, याब्बाक,अर्नोन आणि सारेद