पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३४ पांगळ्या माणसाला बरे करणे. प्रक० १७२ नाजोरी येशू याच्या हातून देवाने जे चमत्कार व अद्भुते व चिन्हें तुम- च्यामध्ये केलीं ह्मणून तुम्ही स्वतां जाणतां, यांवरून तो तुह्मास देवाने दर्शविलेला मनुष्य होता; त्याला तुझी धरून पापी हातांनी खांबावर खिळून मारिले. त्याला देवाने उठविले. तो तर देवाच्या उजवीकडे उंचावला - होऊन आणि पवित्र आत्म्याचे वचन बापापासून पावून, जे तुह्मी आतां पाहतांव ऐकतां ते त्याने घातले आहे. यास्तव सर्व इस्राएलाचे घराणे निश्चये जाणो की, ज्याला तुह्मी खाबी दिले, तोच येशू देवाने प्रभु व ख्रीस्त असा करून ठेवला आहे." हे ऐकून ते अंत:करणांत वरमले आणि ह्मणाले: “अहो भावानो, आमी काय करावे?" मग पेतर त्यांस ह्मणालाः “पश्चात्ताप करा. आणि पापाची क्षमा व्हावी ह्मणून तुह्मांतील प्रत्येक येशू ख्रीस्ताच्या नामाने बाप्तिस्मा घेवो, आणि पवित्र आत्म्याचे दान तुम्हाला प्राप्त होईल. तेव्हां ज्यांनी आनंदाने त्याची गोष्ट घेतली त्यांचा बाप्तिस्मा झाला, आणि त्या दिवसी सुमारे ३००० माणसे त्यांकडे मिळाली, ती तर प्रेषितांचा उपदेश व संगत व भाकर मोडणे (प्रभुभोजन) व प्रार्थना यांत' तत्पर राहत होती. मग प्रत्येक मनुष्याला भय प्राप्त झाले आणि प्रेषितांकडून बहुत अद्धते व चमत्कार घडले. सर्व विश्वास धरणारे तर एकत्र होते, आणि त्यांचे अवघे पदार्थ समाईक होते. ते आपापले माल व वित्तविषय विकून जसजसी प्रत्येकाला गरज लागे, तसी ती सर्वांस वांटून देत असत आणि ते नित्य एकमताने देवळांत जात व घरोघरीं भाकर मोडीत असत, आणि देवाची स्तुति करीत हर्षाने व सालस मनाने अन्न खात असत, सर्व लोकांपासून मानही पावत असत. आणि प्रभु तारण पावणान्यांस नित्य मंडळीला मिळवीत असे. प्रक० १७2. पांगळ्या माणसाला बरे करणे. (प्रेषि० ३ व ४.) २१. पेतर व योहान हे तर प्रार्थना करायास देवळांत बरोबर जात होते, तेव्हां त्याच्या आईच्या उदरापासून पांगळा कोणी एक माणूस होता, त्याला उचलून नेत असत आणि देवळांत जाणाऱ्यांपासीं भीक मागण्या- साठी त्याला देवळाच्या सुंदर नामें दरवाज्याजवळ निस ठेवीत असत. त्याने पेतर व योहान हे देवळांत जाणार असे पाहून भीक मागितली.