पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३२ पवित्र आल्याचे येणे, प्रक० १७१ प्रक० १७१. पवित्र आत्म्याचे येणे. (प्रेषि० १, २.) १. त्या दिवसांत (स्त्रीस्त आकाशांत गेल्यावर) शिष्यांच्या मध्ये पेतर उभा राहून ह्मणाला (त्यांच्या नांवांची संख्या एकंदर सुमारे १२० होती): "भावानो, यहूदा ज्याला आमाबरोबर त्या सेवेचा वाटा मिळाला होता, त्या- विषयीं पवित्र आत्मा दावीदाच्या मुखेकरून जे वचन बोलला, ते पूर्ण होण्याचे अगत्य होते; कांतर "त्याची वस्ती ओसाड होवो व तीत कोणी राहणार नसो आणि त्याचा अधिकार दुसरा घेवो असे गीताच्या पुस्त- कांत (गीत १०९. ८.) लिहिले आहे, ह्मणून प्रभु येशू आह्माजवळ आंत व बाहेर येत जात होता त्या सर्व वेळेस जी ही माणसे आमाबरोबर चालत होती त्यांतून कोणी एक आमच्या संगतीं त्याच्या पुन्हाउठण्याविषयी साक्षी झाला पाहिजे. तेव्हां त्यांनी बार्साबा ज्याला यूस्त ह्मणतात तो, आणि मात्थिय, या दोघांस उभे केले आणि प्रार्थना करीत ह्मटले: “हे सर्वांचे अंतःकरण जाणणाऱ्या प्रभू, ही जी सेवा व प्रेषितपणा यहूदा टाकून आपल्या ठिकाणी गेला, त्यांचा वांटा ज्याला मिळावा असा या दोघांतून खा कोणता निवडला तो दाखीव.” मग त्यांच्या नांवांच्या चिट्या टाकल्या आणि मात्थियाच्या नांवाची चिट्टी निघाली आणि त्याला ११ प्रेषितां- बरोबर मोजलें. २. नंतर पन्नासावा दिवस आल्यावर ") सर्व शिष्य एकचित्ताने एकत्र मिळाले होते. तेव्हां अकस्मात् मोठ्या वाऱ्याच्या सुसाम्यासारखा आका- शांतून नाद आला, आणि जेथे ते बसले होते ते सर्व घर त्याने भरले. आणि विभागलेल्या जिभा अग्नीच्या सारख्या त्यांस दिसल्या, आणि यांतील प्रत्येक जणावर बसल्या. आणि ते अवघे पवित्र आत्म्याने पर्ण झाले आणि आत्म्याने त्यांस उच्चार करण्याची जसी शक्ति दिली तसे ते अन्य भाषांनी बोलू लागले. त्यावेळेस तर यरूशलेमांत आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रांतील यहूदी माणसे राहत होती. ही गोष्ट वाजल्यावर समु- दाय एकत्र होऊन त्यांचा एकच गलबला झाला, कारण प्रत्येकाने आपा- पल्या भाषेत त्यांस बोलतां ऐकिले. मग ते सर्व विस्मित होऊन एकमेकांस ह्मणाले: “पाहा, हे जे बोलतात ते सर्व गालिली लोक आहेतना? तर आह्मी प्रत्येक आपल्या जन्मभाषेत त्यांचे बोलणे ऐकतो हे कसे ? पार्थो व मेदी