पान:पवित्र शास्त्रातील इतिहास.pdf/३५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३० खीस्ताचे आकाशांत जाणे. [प्रक० १६९ तो त्यांस आशीर्वाद देत असतां आणि शिष्य पाहत असतां तो त्यांपासून वर घेतला गेला, आणि मेघाने त्यांच्या दृष्टीपासून त्याला घेतले. आणि तो जात असतां ते आकाशाकडे निरखून पाहत होते,तेव्हां पाहा, पांढरी वस्त्रे ल्यालेले दोन पुरुष त्यांच्या जवळ उभे राहिले आणि ते बोलले : "अहो गालीली माणसानो, तुह्मी आकाशाकडे पाहत कां उभे राहिलां? जो तुह्मापासून वर आकाशांत घेतला तोच येशू; जसे तुह्मी त्याला आकाशांत जातां पाहिले, तसाच येईल." मग ते जाइती झटलेला डोंगर तेथून यरूशलेमांत परत आले. तेथे आल्यावर ते सर्व व बायका आणि येशूची आई मारया व त्याचे भाऊ ही एक चित्ताने प्रार्थना व विनती करण्यांत तत्पर राहिली. सूचना. आकाशांत जाऊन खीस्ताने जगाच्या मांडण्यापूर्वी जो महिमा त्याला बापापासीं होता तो,आणि मनुष्य होतेसमयीं ज्याकडून त्याने आप- णाला रिक्त केले होते ते देवाचे रूपही त्याने परत घेतले. ज्या ठिकाणी देव आहे, त्या ठिकाणी आकाश आहे. परंतु देव सर्व ठिकाणी असल्यामुळे ख्रीस्ताचें आकाशांत जाणे हे ईश्वरी सर्वव्यापकता ग्रहण करणे असे आहे. या कारणास्तव बापाजवळ जाते वेळेस ख्रीस्ताने आपल्या शिष्यांस सांगितले की: “पाहा, काळाच्या समाप्तीपर्यंत मी तुह्माबरोबर सर्वकाळ आहे" (मात्थी २८, २०). आणखी तो असें- ही ह्मणालाः “जेथे दोघे तिघे माझ्या नामाने जमले आहेत तेथे त्यां- च्यामध्ये मी आहे" (माथी १८, २०). यास्तव खील आमचा तार- णारा तो देव व मनुष्य मिळून असा सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, सर्वव्यापक असतां देव जो बाप त्याच्या उजवीकडे बसला आहे. त्याने त्याला सर्वसत्ता, अधिकार, पराक्रम व धनीपण देऊन किंबहुना प्रत्येक नाम, जे इहलोकीच केवळ नव्हे तर परलोकींही मटले, त्यापेक्षा फार उंच केले आहे, आणि अवघी त्याच्या पायांखाली ठेवली आणि त्याला अव- घ्यांचा मस्तक असे करून मंडळीला दिले आहे; तीच त्याचे शरीर आहे (एफस० १, २०–२२). काळाच्या समाप्तीस तर तो जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायाला परत येईल आणि अवघ्या गोष्टीची पूर्णता करील. GENERAL खेड, (पु.) S